पाऊस सुरूच राहिल्यास पवना धरणातून पाण्याचा होणार विसर्ग
Updated On:

| पिंपरी – पवना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत धरणात ७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात प्रचंड वेगात पाणी येत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास कधीही पवना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता आहे.
पवना धरण परिसरात आत्ताही पावसाचा जोर कायम राहिला आहे. त्यामुळे धरणात प्रचंड वेगाने पाणी येत आहे. सकाळी सहा वाजता पवना धरणात ६७.८० इतका साठा होता. आत्ता दुपारी बारा वाजता धरणातील पाणीसाठ्यात चार टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून सध्या धरणात ७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. असाच जर पावसाचा जोर कायम राहिल्यास पवना धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना पवना धरण अभियंत्यांकडून सुचित करण्यात आले आहे की, नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात. योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या पवन धरण अभियंत्यांनी केले आहे. |
टॅग्स:




