पिंपरी चिंचवड, मावळमधील शाळांना सुटटी जाहिर
Updated On:

पिंपरी – पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत अतिवृष्टी झाली आहे. तसेच आगामी 24 तासांतही मुसळधार पावसाची नोंद होणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड, मावळसह जिल्ह्यातील सर्व शाळांना गुरुवारी (दि. 25) सुटटी जाहीर केली आहे.
राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. तसेच मावळमधील कासारसाई धरणातूनही पवना नदीत साडेतीन हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले असून आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पिंपरी चिंचवड, मावळसह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहिर केली आहे.




