Fatima Sana Shaikh : ‘आप जैसा कोई’ आणि ‘मेट्रो इन दिनोंं’ या दोन सिनेमांमुळे धाकड गर्ल म्हणून सिनेमा इंडस्ट्रीत ओळख मिळवलेली अभिनेत्री फातिमा सना शेख तिने केलेल्या विधानामुळे चर्चेत आहे. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देत तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. या दोन्ही सिनेमांपैकी एक सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला होता, तर एक सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांबाबत एक विधान करत आपलं मत व्यक्त केलं आहे. या दोन्ही सिनेमात अभिनेत्री फातिमा सना शेखने साकारेली पात्र ही त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या व्यक्तींच्या प्रेमात पडतात. या मुलाखतीत तिने आपलं प्ररखड मत व्यक्त करत वय ही कोणत्या नात्याची समस्या नाही, असं म्हटलं आहे. TOI ला दिलेल्या मुलाखतीत तिने यावर भाष्य केलं आहे. जर दोन्ही जोडीदारांच्या भावना नात्यात जुळत असतील, तर मुलगा माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठा असला तरी काही फरक पडत नाही. भावनांची पातळी सारखीच असली पाहिजे. वयाचा फरक शतकानुशतके होत आला आहे, असं मत तिने व्यक्त केलं आहे. ‘रहना है तेरे दिल में’ सिनेमातील अभिनेता आर माधवनसोबतच्या कामाच्या अनुभवाबद्दल फातिमा सना शेख म्हणाली, मी खूप भाग्यवान आहे. या सिनेमात आमची केमिस्ट्री खूप नैसर्गिक होती. तो एक सक्षम अभिनेता आहे. तो स्वतः एक दिग्दर्शक देखील आहे, असं म्हणत तिने आर माधवनचं कौतुक केलं आहे. ११ जुलै रोजी आप जैसा कोई हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिनेत्री फातिमा सना शेख आणि आर माधवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन विवेक सोनी यांनी केलं आहे. हेही वाचा : उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्याकडे दोन मतदान ओळखपत्र? ; ऑनलाईन पुरावा दाखवत तेजस्वी यादवांचा दावा