Rahul Gandhi disqualified : गरज पडली तर लोकशाही वाचवण्यासाठी तुरुंगातही जाऊ – मल्लिकार्जुन खर्गे

नवी दिल्ली – मानहानीच्या एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने त्याची अधिसूचना जारी केली आहे. आता जर राहुल गांधींना वरच्या कोर्टातून दिलासा मिळाला नाही तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, खासदार आणि आमदारांना कोणत्याही परिस्थितीत 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असेल, तर त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभेतून) रद्द केले जाईल. एवढेच नाही तर शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर ते सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासही अपात्र ठरतील.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. देशभरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द केल्याबद्दल सांगितले की, ‘राहुल यांना खरे बोलण्याची शिक्षा झाली आहे. राहुल सत्य देशासमोर ठेवत होते. जे सरकार ऐकू इच्छित नाही, त्यांना सभागृहाबाहेर काढत आहे. पण आम्ही सभागृहातही बोलू आणि सभागृहाबाहेर बोलू आणि याविरोधात आवाज उठवू.
ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारला सर्वात जास्त भीती राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची वाटते. लोकशाहीची हत्या करण्यासाठी त्यांनी राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केले आहे. त्यांना खरे बोलणाऱ्यांना गप्प करायचे आहे. देशवासी ही हुकूमशाही सहन करणार नाहीत. गरज पडली तर लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही तुरुंगातही जाऊ. असं देखील मलिक्कार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.
मोदी सरकार को सबसे ज़्यादा डर श्री @RahulGandhi व कांग्रेस पार्टी से लगता है।
लोकतंत्र की हत्या करने लिए उन्होंने श्री गाँधी की संसद सदस्यता रद्द की है।वो सच बोलने वालों का मुँह बंद करना चाहते हैं।
देशवासी ये तानाशाही नहीं सहेंगे।
लोकतंत्र की हिफ़ाज़त के लिए हम जेल तक जाएँगे। pic.twitter.com/bxvwwJik5U— Mallikarjun Kharge (@kharge) March 24, 2023
दरम्यान, राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खर्गे यांच्या नेतृत्वाखाली ‘मोदी सरकार ‘ विरोधात विरोधी खासदारांनी संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला.
… तरच त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात येईल
दरम्यान, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलीय. काल सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांनी 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज लोकसभेने राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलंय. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का आहे. लोकसभा सचिवालयानं कायद्यानुसार राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलंय. भविष्यात जर राहुल यांची शिक्षा कमी झाली तरच त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात येईल.



