“मर्द होतात तर पळून का गेलात?”; बाळासाहेब थोरातांचा सुजय विखे पाटील यांच्यावर निशाणा

Balasaheb Thorat | भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंत देशमुख यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर पसरले होते. या प्रकरणी देशमुख यांच्या विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर फरार असलेल्या वसंत देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणानंतर थोरात गट विरुद्ध विखे पाटील गटाच्या वाद चर्चेचा विषय ठरला आहे.
जयश्री थोरात यांच्याबद्दल विखे पाटील यांच्या समर्थक वसंतराव देशमुख यांनी बेताल वक्तव्य केल्यानंतर ‘तुम्ही मर्द होतात तर पळून कशाला गेला?’ असा सवाल थोरातांनी केला आहे. ते म्हणाले, “धांदरफळमध्ये ज्यावेळी हे वक्तव्य झाले, त्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवत होते, हसत होते. मग तुम्ही जबाबदार कसे नाहीत? एवढं वक्तव्य केलं, त्यानंतर पुढच्या सभेत जास्त वेळ देऊ अस सुजय बोलले. कानफडात देण्याऐवजी वेळ देऊ बोलले.” Balasaheb Thorat |
“सुजय विखेंना विचारण्यासाठी महिला गेल्या आणि तो महिलांचा अवतार पाहून सुजय पळून गेले. तुम्ही जर मर्द होतात तर पळाले कशाला? तसेच या वक्तव्यानंतर पंधरा मिनिटात लोक आले की म्हणालात आमच्यावर हल्ला करण्याचा कट होता. जया रडली नाही लढली. ती स्वातंत्र्य सेनानीच्या घरातली मुलगी आहे. आमच्या तालुक्यात नादाला लागू नका. लागल्यावर काय होत ते पाहिलं. ही तर फक्त झलक होती,” असे थोरात म्हणाले. Balasaheb Thorat |
बाळासाहेब थोरात यांचे विखे पाटलांना आव्हान
“शिर्डी मतदारसंघात विकास करण्यासाठी काम करायचा आहे तर तुलना होऊन जाऊ द्या. दोन्ही व्यक्तिमत्व दोन्ही तालुके विकास आणि जनता न्यायालयात सगळं मांडू. संगमनेर आणि शिर्डी मतदारसंघ राज्याचं केंद्र बनला आहे. आता सगळे मतभेद विसरून एकत्र यावं लागेल. ते आरोप करतात आमच्याकडे विकास झालेला नाही. एकदा तुलना होऊन द्या, एकदा कुठे दहशत आहे आणि दडपशाही आणि मग जनता निर्णय देईल मतांच्या रूपाने आहे. विकास कोणी केला कोणी नाही? जनतेशी संवाद कसा आहे कोणाचा, हे सगळं दोन्ही तालुक्यातील जनतेसमोर मांडा आणि तुलना करा,” असे आव्हान बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांना दिले आहे. Balasaheb Thorat |
हेही वाचा:
“जो वाटेत येईल …”, लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून खासदार पप्पू यादव यांना धमकी





