भारताने औषध पाठवले नाही तर…; ट्रम्प यांचा भारताला इशारा

वॉशिंग्टन – करोना व्हायरसने अमेरिकेत थैमान घालत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडे मदत मागितली आहे. मात्र यावेळेस ट्रम्प यांनी भारताला धमकीवजा इशारा दिला आहे. भारताने मदत नाही तर काही हरकत नाही,परंतु त्यांनीही आमच्याकडूनही तशी अपेक्षा ठेवण्याची गरज नाही, असे ट्रम्प यांनी भारताला म्हंटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटले की, मी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. तुम्ही आम्हाला हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करत आहात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत असं सांगितलं आहे. पण जर त्यांनी पुरवठा केला नसता, तरी काही हरकत नव्हती. पण मग आम्हीही जशास तसं उत्तर दिलं असतं, आणि ते आम्ही का करु नये ?, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
I spoke to him (PM Modi), Sunday morning & I said we appreciate it that you are allowing our supply (of Hydroxychloroquine) to come out, if he doesn’t allow it to come out, that would be okay, but of course, there may be retaliation, why wouldn’t there be?: US Pres Donald Trump pic.twitter.com/kntAqATp4J
— ANI (@ANI) April 6, 2020
करोनाव्हायरसच्या उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा उपयोग होतो. भारतामध्ये बऱ्याच कंपन्या हे औषध मोठ्या प्रमाणात तयार करीत आहेत. सध्याच्या कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाचाच्या काळात भारताने हे औषध अमेरिकेला द्यावे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली होती. मात्र, भारत अनेक वर्षापासून अनेक कंपन्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या तयार करीत आहे. त्यामुळे याचा भारताकडे मोठ्या प्रमाणात साठा आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत भारताला याची गरज लागू शकते म्हणून भारताने या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.





