Mohan Bhagwat | मणिपूर भेटीदरम्यान एका सभेला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदूंशिवाय जगाचे अस्तित्व संपून जाईल, असे मत व्यक्त केले आहे. हिंदू राहिला नाही तर जग राहणार नाही, हिंदू समाज जग चालवण्यात अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच यूनान (ग्रीक), मिस्र (इजिप्त) आणि रोम यासारखी साम्राज्य नष्ट झाली पण भारताने अजूनही आपले अस्तित्व टिकवून ठेवले असल्याचेही त्यांनी नमूद केले. मोहन भागवत मणिपूर येथे झालेल्या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी एका सभेला संबोधित करताना यासंबंधी वक्तव्य केले. मोहन भागवत म्हणाले की, “जगात सर्व देशांना वेगळ्या परिस्थितींचा सामना करावा लागला. काही देश त्यामध्ये संपुष्टात आले. यूनान, मिस्त्र, रोमा सब मिट गये जहां से, कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी (ग्रीक, इजिप्त, रोम यासारखी साम्राज्य जगातून नष्ट झाली, काहीतरी असेल की आपले अस्तित्व संपुष्टात आले नाही),” असे मोहन भागवत म्हणाले. भारत हे एक अमर समाजाचे नाव पुढे ते म्हणाले, “भारत हे एक अमर समाजाचे नाव आहे. बाकी सर्व आले, चमकले आणि निघून गेले. मात्र या सर्वांचा उदय आणि अस्त आपण पाहिला आहे आणि आपण अजूनही आहोत आणि राहणार आहोत. कारण आपण आपल्या समाजाचे एक बेसिक नेटवर्क तयार केले आहे. ज्यामुळे हिंदू समाज टिकून राहिल. हिंदू राहिला नाही, तर जगही राहणार नाही. कारण ही जी धर्म नावाची गोष्ट आहे, ज्याचा मी उल्लेख केला तो वेळोवेळा जगून जगाला देणे हे हिंदू समाजच करेल, हे परमेश्वराने सोपवलेले कर्तव्य आहे.” Mohan Bhagwat | “इतके मोठे-मोठे नक्षलवादी संपले, कारण समाजाने ठरवले की आता पुरे झाले, आता सहन करणार नाही. समाज निष्क्रिय राहिला नाही. ज्या शक्ती याच्या विरोधात होत्या, त्यांच्यासोबत समाज गेला. त्यांचा बल वाढले, यांच्यावर नियंत्रण मिळाले. ही प्रक्रिया सतत चालू राहते. ब्रिटिशांचे साम्राज्य असे होते की त्यांच्यावर सूर्य मावळत नव्हता. पण भारतात त्यांच्या सूर्याचा अस्त सुरू झाला. ९० वर्षे (१८५७ ते १९४७) आम्ही स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होतो. आम्ही सर्वजण स्वतंत्र होण्यासाठी लढलो,” असेही त्यांनी सांगितले. Mohan Bhagwat | मणिपूरमध्ये सरकार निश्चितच असले पाहिजे पुढे मोहन भागवत मणिपूरमध्ये सरकार असण्याबाबत देखील विधान केले. “सरकार आणि पक्षांच्या बाबतीत मी फार हस्तक्षेप करत नाही, पण मणिपूरमध्ये सरकार निश्चितच असायला हवी आणि माझ्या माहितीनुसार त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. Mohan Bhagwat | हेही वाचा: “धनंजय मुंडे स्टार प्रचारक म्हणून मतदारसंघात आले तर..”; राष्ट्रवादीच्या आमदाराला वेगळीच शंका, थेट अजितदादांना निरोप