Rohit Pawar : सत्तेचा आधार घेऊन सावंत यांना धमक्या देत असेल, तर…; ‘त्या’ प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक म्हणाले….

पुणे: इतिहासकार आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. याविषयी खुद्द सावंत यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सच्या पोेस्टमध्ये संबंधित व्यक्ती सत्तेचा आधार घेऊन सावंत यांना धमक्या देत असेल, तर आम्ही ते कदापि खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.
प्रसिद्ध इतिहासकार संशोधक इंद्रजित सावंत यांना मुख्यमंत्र्यांचं नाव वापरून देण्यात आलेली धमकी निषेधार्ह आहे. सावंत यांनी इतिहास संशोधनात केलेलं कार्य महाराष्ट्र आणि येणाऱ्या पिढीसाठी मोलाचे असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत. अशात कोण तो प्रशांत कोरटकर नामक व्यक्ती सत्तेचा आधार घेऊन सावंत यांना धमक्या देत असेल, तर आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात नेहमीच विचारवंत, संशोधक आणि इतिहासकार यांना आदराचे स्थान राहिलेलं आहे. पण एका विशिष्ट हेतूने पुरोगामी विचारवंतांवर हल्ले करण्याची मानसिकता महाराष्ट्रासाठी शोभणारी नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
प्रसिद्ध इतिहासकार संशोधक इंद्रजित सावंत यांना मुख्यमंत्र्यांचं नाव वापरून देण्यात आलेली धमकी निषेधार्ह आहे. सावंत यांनी इतिहास संशोधनात केलेलं कार्य महाराष्ट्र आणि येणाऱ्या पिढीसाठी मोलाचं आहे. अशात कोण तो प्रशांत कोरटकर नामक व्यक्ती सत्तेचा आधार घेऊन सावंत यांना धमक्या देत…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 25, 2025
तसेच पुरोगामी विचारवंतांवर पूर्वी झालेले जीवघेणे हल्ले पाहता इंद्रजित सावंत यांना सरकारने तातडीने पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी आणि धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रोहित पवारांनी एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे.
इतिहास संशोधक इंद्रिजत सामंतांना जीवे मारण्याची धमकी
इतिहासकार आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकीचा फोन आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रशांत कोरटकर असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी रात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास सावंत यांना धमकीचे दोन फोन आले. पहिला फोन आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाकरडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मात्र, दुसऱ्यांदा फोन आल्यानंतर संबंधित व्यक्तीने घरी येऊन बघून घेऊ, अशा भाषेत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. इंद्रजित सावंत यांनी याविषयी एक पोस्ट लिहित माहिती दिली आहे. ब्राह्मणद्वेष पसरवण्या प्रकरणाचा रोष फोन करणाऱ्या व्यक्तीने धमकी देताना बोलून दाखवला, असल्याचे त्यांनी सांगितले.





