Rohit Pawar : मोठी बातमी! रोहित पवार पुन्हा पत्रकार परिषद घेणार; आता कोणती धक्कादायक माहिती देणार? अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष
Rohit Pawar : अजित पवार विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी एक्सवरून पोस्ट शेअर करत सांगितले आहे. त्यामुळे ते आता कोणती नवी माहिती देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Rohit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दुर्देवी घटनेला उद्या २८ फेब्रुवारीला एक महिना पूर्ण होत आहे. या एका महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी २६ फेब्रुवारीला एकमताने सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आक्रमक भूमिका घेत विमान कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. व्हीएसआर व्हेंचर्स, एरो कंपनी आणि डीजीसीए विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.
२६ फेब्रुवारीला त्यांनी बारामती शहर पोलिस स्टेशन येथे जाऊन गुन्हा दाखल करण्याचा मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत युगेंद्र पवार देखील उपस्थित होते. याअगोदर रोहित पवार यांनी मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
आता रोहित पवार यांनी एक्सवरून एक पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार असून धक्कादायक माहिती देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते पत्रकार परिषेदेतून कोणती नवी माहिती देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एक्सवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी उद्या AAIB चा प्राथमिक अहवाल येईल आणि या अहवालातून सत्य गोष्टी बाहेर येतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सोमवारी आम्ही आमच्याकडे असलेली नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
रोहित पवारांचे एक्सवरील ट्वीट (Rohit Pawar )
अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताला उद्या एक महिना पूर्ण होत असून केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या AAIB चा प्राथमिक अहवाल येईल आणि या अहवालातून सत्य गोष्टी बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे. येत्या सोमवारी आम्ही आमच्याकडे आलेली नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहोत, त्यामुळे भूतकाळातील इतर घटनांप्रमाणे थातुरमातूर अहवाल देण्याचा प्रयत्न AAIB नक्कीच करणार नाही, ही अपेक्षा!
अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताला उद्या एक महिना पूर्ण होत असून केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या AAIB चा प्राथमिक अहवाल येईल आणि या अहवालातून सत्य गोष्टी बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे. येत्या सोमवारी आम्ही आमच्याकडे आलेली नवी माहिती आणि…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 27, 2026
बारामती येथे पोलिसांसोबत भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले? Rohit Pawar
झिरो एफआयआर मुंबईत घ्यावी यासाठी तिथं गेलो होतो. मुंबईत एफआयआर दाखल करु न घेतल्यानं आम्ही बारामतीत आलो. आम्हाला दुसरा कुठला पर्याय राहिला नाही. जिथं ही घटना घडली तिथं म्हणजे बारामतीच्या भूमीत यावं लागलं, असे रोहित पवार म्हणाले. आम्ही दादांच्या प्रेमापोटी लढतोय, असे देखील रोहित पवार यांनी सांगितले.
रोहित मरीन ड्राइव्ह आणि बारामती पोलिस ठाण्यानंतर त्यांनी थेट सीआयीडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते म्हणाले, मुंबई आणि बारामतीत आमच्या तक्रारीनुसार एफआयर घेतला गेला नाही. २४ तारखेला डीजीसीएच्या रिपोर्टमधे VSR ला दोषी धरलंय. त्यामुळे आम्ही व्हीएसआरवर एफआयआर करण्याची मागणी केली. मात्र सीआयडीने देखील नकार दिला आहे, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. यानंतर सीआयडीने पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती दिली.






