“हेच जर एखाद्या पुरुष कलाकारानं केलं तर…’; इंटिमेट सीनमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर तमन्ना स्पष्टच बोलली

मुंबई – नुकतंच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या “लस्ट स्टोरीज’ या चित्रपटाचा दुसरा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. चार दिग्दर्शकांच्या चार कथांवर लोक वेगवेगळी मते व्यक्त करत आहेत. या चित्रपटाच्या एका कथेत तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा दिसले आहेत. या कथेचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे.
मात्र तमन्ना यातील तिच्या इंटिमेट सीन्समुळे आता मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसत आहे. या चित्रपटात तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्यात काही इंटिमेट सीन्स शूट करण्यात आले आहेत. दरम्यान, यावरून आता नेटकऱ्यांनी तमन्नावर टीका केलीआहे. चित्रपटात तमन्ना आणि विजय यांचा हा सिन खूपच बोल्ड पद्धतीने शूट केल्याचं दिसून आलं आहे.
मात्र, आता आपल्यावर टीका करणाऱ्यांना अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने चोख उत्तर दिले असल्याचं दिसून येत आहे. तमन्नाने स्वतः एका मुलाखतीत या सगळ्यावर बोलून प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना गप्प केलं आहे. तमन्ना भाटिया म्हणते की, “लोक मला ज्या पद्धतीने जज करत आहेत ते पाहून आश्चर्य वाटते. अशा दृश्यांसाठी कलाकारांचे कौतुक केले जाते. हेच सीन जर एखाद्या हिरोनं, पुरुष कलाकारानं केले असते तर त्याचं कौतुक झालं असतं. पण एखाद्या अभिनेत्रीनं असे सीन दिले तर तिला ट्रोल केलं जात.
लोक मुलींना न्याय देण्यासाठी वेळ घेत नाहीत. आणि हे खूप विचित्र वाटले कारण एक अभिनेत्री म्हणून जर मी सिरीयल किलरची भूमिका साकारली तर मी तशी होईन का?” असं तमन्ना म्हणाली. विशेष म्हणजे, अभिनेता विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया केवळ रीलमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या नात्यात आहेत. बऱ्याच वेळा मीडियावर त्यांच्या रिलेशनशिप बाबत चर्चा होताना दिसून येत.





