आयडीबीआय बॅंक चोरी प्रकरणाचा तपास “जैसे थे’
Updated On:

फलटण – साखरवाडी, ता. फलटण येथील आयडीबीआय बॅंकेच्या शाखेत झालेल्या 79 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी पोलिसांना अद्याप कोणताही धागादोरा सापडलेला नाही.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे शाखेकडूनही तपास सुरू आहे. साखरवाडी येथे आयडीबीआय बॅंकेची शाखा आहे. या शाखेच्या इमारतीची मागील बाजूच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवून चोरट्यांनी स्ट्रॉंगरूममधील तिजोरी कापली होती. बॅंक ग्राहकांनी सोने तारण कर्जापोटी तारण ठेवलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी या स्ट्रॉंगरूममधून चोरून नेले. चोरट्यांनी 43 ग्राहकांच्या दोन किलो 640 ग्रॅम वजनाच्या सुमारे 79 लाख 20 हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.





