ICC Women’s World Cup 2022 | ऑस्ट्रेलियाची वेस्ट इंडीजवर मात

वेलिंग्टन – महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी झालेल्या लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा 7 गडी राखून पराभव करत आगेकूच केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेच्या बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.
वेस्ट इंडीजची कर्णधार स्टिफनी टेलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय युकीचा ठरला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजांवर दडपण टाकताना त्यांचा डाव 46 व्या षटकांत 131 धावांवर रोखला.
वींडिजकडून कर्णधार टेलरने अर्धशतक फटकावले मात्र, तीला अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही. टेलरने आपल्या 50 धावांच्या खेळीत 91 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार फटकावले. शेमीन कॅम्पबेलने 20, डेंड्रा डॉटिनने 16 धावा करत संघाच्या धावसंख्येत भर घातली. ऑस्ट्रेलियाकडून एलिस पेरी व अश्ले गार्डनर यांनी प्रत्येती 3 गडी बाद केले.
जेस जोनासेनने 2 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने 31 व्या षटकांत 3 गडी गमावून 132 धावा करत विजय साकार केला. त्यात रशेल हेन्सने संघाची सुत्रे एकहाती सांभाळत संघाचा विजय सुकर केला. तीने नाबाद 83 धावांची खेळी करताना 95 चेंडूत 9 चौकार फटकावले. एलिस पेरीने 10 धावा केल्या. मात्र, त्यानंतर बेथ मुनीने नाबाद 28 धावा करत बेन्सला सुरेख साथ दिली. या जोडीने अखंडीत अर्धशतकी भागीदारी केली. वेस्ट इंडीजकडून हॅले मॅथ्युज, शॅमिला कोनेल व शिनेल हेनरी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.





