ICC Women’s T20 World Cup 2024 : विश्वकरंडकाच्या विजेतेपदासाठी तयारी पूर्ण – हरमनप्रीत कौर

ICC Women’s T20 World Cup 2024 :- दोन वेळेस अंतिम लढतीत पोहचून देखील विश्वकरंडक स्पर्धेवर भारताला विजेतेपदाची मोहोर लावण्यात अपयश आले होते. दोन्ही संघात सध्याची कर्णधार असलेल्या हरामनप्रीत कौरचा समावेश होता. दोन्ही वेळेस विजेतेपदाने संधी हुकल्याने यावेळी विजेतेपद मिळविण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संघ तयारी करत असून यावेळी आमचे सर्व विभाग विजेतेपदासाठी आतूर असल्याचे कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले. टी-20 विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी हरमनप्रीत बोलत होती.
बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे ही संपूर्ण स्पर्धा दुबई व शारजाह येथे हलविण्यात आली आहे. स्पर्धेत भारतीय संघ दोन सराव सामने खेळल्यानंतर मुख्य स्पर्धेत उतरणार आहे. भारत सलामीची लढत ४ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड संघासोबत खेळणार असून त्यानंतर पाकिस्तान, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हान असणार आहे.
💬💬 The preparation has been fantastic.
Hear what #TeamIndia Head Coach Amol Muzumdar had to say ahead of the upcoming #T20WorldCup in UAE👌👌 pic.twitter.com/AfETLo0GoA
— BCCI Women (@BCCIWomen) September 24, 2024
भारताने २०१७ व २०२० साली स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, विजेतेपदाने दोन्ही वेळेस हुलकावणी दिली होती. या संदर्भात बोलताना हरमनप्रीत म्हणाली, आम्ही सर्वजण बऱ्याच काळापासून एकत्र खेळत आहोत. त्यामुळे हा पुढे जाणारा सर्वोत्तम संघ असून या मालिकेसाठी आमचे सर्व विभाग चांगली कामगिरी करून दाखविण्यासाठी उत्सूक आहोत.
फिटनेस आणि क्षेत्ररक्षण
जुलै अखेरीस श्रीलंके विरुद्ध झालेल्या आशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर विश्वकरंदक स्पर्धेच्या तयारीसाठी सर्वच खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी खेळाडूंनी फिटनेस आणि क्षेत्ररक्षण या कमकुवत बाजूंवर विशेष मेहनत घेतली आहे. मैदानावर धावांचा बचाव करताना क्षेत्ररक्षण महत्वाचे असते, अनेकदा क्षेत्ररक्षणातील चुकांचा भारतीय महिला संघाला फटका बसलेला आहे. त्यामुळे यावेळी भारतीय संघाने क्षेत्ररक्षणावर विशेष मेहनत घेतली असल्याचे मुख्य प्रशिक्षक मुझुमदार यांनी बोलताना सांगितले. सराव शिबिरामध्ये खेळाडूंच्या क्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही योग आणि मानसशास्त्राची सत्रे आयोजित केली होती.
ICC Women’s T20 World Cup 2024 : संयम राखून दबावावर मात करावी – डायना एडलजी
भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, संजना संजीवन. यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), श्रेयंका पाटील.





