IND vs PAK : आयसीसीने रौफवर केली कारवाई! फरहानने शिक्षेपासून वाचण्यासाठी घेतलं धोनी-कोहलीचं नाव

IND vs PAK ICC Action : आशिया कप 2025 च्या सुपर फोर सामन्यात भारताविरुद्ध केलेल्या सेलिब्रेशनमुळे साहिबझादा फरहान आणि हारिस रौफच्या यांच्याबाबत बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार केली होती. यावर शुक्रवारी आयसीसीच्या सुनावणीत फरहानने याबाबत स्पष्टीकरण दिले. ज्यामध्ये त्याने धोनी-कोहलीने केलेल्या सेलिब्रेशनचा उल्लेख केला.
फरहानने धोनी-विराटचा दिला दाखला –
साहिबझादा फरहानने सांगितले की, त्याचे सेलिब्रेशन कोणत्याही प्रकारे राजकीय नव्हते आणि त्याचा उद्देश फक्त आनंद व्यक्त करणे हा होता. फरहानने 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर ‘गन सेलिब्रेशन’ केले होते, यासंदर्भात त्याने भारतीय दिग्गज खेळाडू एमएस धोनी आणि विराट कोहली यांनी भूतकाळात केलेल्या अशाच सेलिब्रेशनचा दाखला दिला.
बीसीसीआयने केली होती तक्रार –
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) फरहान आणि वेगवान गोलंदाज हारिस रौफ यांच्या कृतीला भडकाऊ मानत आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती. फरहानच्या सेलिब्रेशनला भारतात संवेदनशील मानले गेले, विशेषत: पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यांच्याशी जोडले गेले, ज्यामुळे वाद अधिक तीव्र झाला.
हेही वाचा – IND vs PAK : रौफ-फरहानवर ICC च्या कारवाईची टांगती तलवार, सूर्यकुमार यादवला दिलासा
हारिस रौफने काय दिले स्पष्टीकरण –
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफलाही टीकेला सामोरे जावे लागले. त्याने ‘6-0’ दाखवणारा इशारा केला आणि फायटर जेट पाडल्याची नक्कल केली, ज्याला काही लोकांनी राजकीय संदर्भाशी जोडले. आयसीसीच्या सुनावणीत रौफने स्वत:ला निर्दोष ठरवत सांगितले की, त्याच्या इशाऱ्याचा भारताशी कोणताही संबंध नाही.
आयसीसीने काय केली कारवाई?
Haris Rauf fined 30 per cent of his match fees for abusive behaviour and aggressive gesture during Indo-Pak Asia Cup game: Tournament Sources.
— Press Trust of India (@PTI_News) September 26, 2025
साहिबझादा फरहान आणि हारिस रौफच्या यांच्याबात सुनावणी पूर्ण झाली. पीटीआयच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या दोन्ही खेळाडूंना आचारसहिंतेअंतर्गत लेव्हल एकच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यानुसार वेगवान गोलंदाज हारिस रौफला मॅच फिच्या 30% दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर साहिबझादा फरहानला फक्त वॉर्निंग देण्यात आली आहे.
हेही वाचा – IND A vs AUS A : भारतीय संघाने रचला इतिहास! ‘या’ खास पराक्रमाची नोंद करणारा ठरला जगातील पहिलाच संघ
टिपणीमुळे सूर्यावरही कारवाई –
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया कप गटातील पाकिस्तानविरुद्धच्या गट साखळी सामन्यानंतर, मे महिन्यात झालेल्या लष्करी चकमकीचा उल्लेख करताना केलेल्या टिप्पणीबद्दल त्याच्या सामन्याच्या शुल्काच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, असे स्पर्धेच्या आयोजकांनी शुक्रवारी सांगितले. 4 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध मिळालेला विजय हा पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केल्याची टिपणी कर्णधार सूर्याने केली होती. या टिपणीवरुन पाकिस्तानने आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती.





