Yashasvi Jaiswal ICC Test Rankings : यशस्वी जैस्वालने इंग्लडविरुद्ध शानदार द्विशतक झळकावले होते. यशस्वी जैस्वालने विशाखापट्टणम कसोटीत 209 धावांची संस्मरणीय खेळी खेळली. त्याचवेळी या खेळीमुळे टीम इंडियाला ब्रिटीशांचा पराभव करण्यात यश आले. मात्र, आयसीसी क्रमवारीत या खेळीचा यशस्वी जैस्वालला जबरदस्त फायदा झाला आहे. भारतीय सलामीवीराने आयसीसी कसोटी क्रमवारीत 37 स्थानांनी झेप घेतली आहे. आता यशस्वी जैस्वाल आयसीसी कसोटी क्रमवारीत 29व्या स्थानावर पोहोचला आहे.
यशस्वी जैस्वाल इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सातत्याने धावा करत आहे. हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने 74 चेंडूत 80 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार मारले. मात्र, या कसोटीच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल अवघ्या 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे खेळली गेली. या कसोटीच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने 290 चेंडूत 209 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार आणि 7 षटकार मारले.
त्याचबरोबर या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी जैस्वाल पहिल्या क्रमांकावर आहे. यशस्वी जैस्वालने 2 कसोटी सामन्यात 80.25 च्या सरासरीने 321 धावा केल्या आहेत. मात्र, यशस्वी जैस्वालने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. आता भारताचा हा युवा सलामीवीर आयसीसी कसोटी क्रमवारीत 29व्या स्थानावर पोहोचला आहे.
IND vs ENG Test Series : जयस्वाल, बुमराह व अश्विन विक्रमांच्या पंक्तीत….
विशाखापट्टणम कसोटीपूर्वी यशस्वी जैस्वाल आयसीसी कसोटी क्रमवारीत 74व्या स्थानावर होता, मात्र या कसोटीनंतर यशस्वी जैस्वालने 37 स्थानांची झेप घेतली आहे. इंग्लंडविरूध्दच्या मालिकेतील अजूनही तीन सामने बाकी आहे. या तीन कसोटीत जर यशस्वीची कामगिरी अशीच राहिली तर येत्या काळात तो क्रमवारीत अजून मोठी झेप घेऊ शकतो.