Bangladesh T20 World Cup 2026 Boycott Loss : आयपीएल २०२६ मधून वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानची हकालपट्टी झाल्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरक्षेचे कारण पुढे करत २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार दिला आहे. मात्र, बांगलादेशचा हा हेका त्यांच्याच अंगाशी येण्याची शक्यता असून, यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. बांगलादेशचा नेमका पवित्रा काय? मुस्तफिझूरवरील कारवाईनंतर संतापलेल्या बीसीबीने आयसीसीला (ICC) पत्र लिहून आपण विश्वचषकासाठी भारतात येणार नसल्याचे कळवले आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे संयुक्तपणे आहे. बांगलादेशने आपले सर्व सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली आहे. मात्र, हा निर्णय बांगलादेशसाठी ‘उलटा’ पडू शकतो. यजमानपद आणि खर्चाचे गणित – विश्वचषक स्पर्धेचे आयोजन हे यजमान देशासाठी अत्यंत खर्चिक असते. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा विचार केल्यास, एका सामन्याचे ब्रॉडकास्टिंग मूल्य साधारणपणे १३८.७ कोटी रुपये इतके होते. स्टेडियमची डागडुजी: आयसीसीच्या निकषांनुसार, बीसीसीआयने प्रत्येक स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च केले होते. लॉजिस्टिक्स: खेळाडूंचा प्रवास, पंचतारांकित हॉटेलमधील निवास, खानावळ आणि कडेकोट सुरक्षा यांचा संपूर्ण खर्च यजमान बोर्डाला करावा लागतो. हेही वाचा – Shikhar Dhawan Wedding : ‘गब्बर’ पुन्हा चढणार बोहल्यावर! सोफी शाइनसोबत ‘या महिन्यात बांधणार लग्नगाठ बांगलादेशला होणारा तोटा – जर बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला, तर त्याचे थेट परिणाम त्यांच्या तिजोरीवर होतील: १. बक्षीस रकमेवर पाणी: नियोजित सामने न खेळल्यास आयसीसीकडून मिळणारी मोठी बक्षीस रक्कम आणि सहभाग शुल्क बांगलादेशला मिळणार नाही. २. विश्वासार्हतेचा प्रश्न: आंतरराष्ट्रीय स्तरावर बीसीबीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. भविष्यात द्विपक्षीय मालिका किंवा बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांना इतर देश टाळू शकतात. ३. बीसीसीआयवर परिणाम कमी: बांगलादेश न आल्यास जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात थोडी घट होईल, मात्र बीसीसीआय ही तूट आयपीएल किंवा इतर स्पर्धांमधून सहज भरून काढू शकते. मात्र, बांगलादेशसाठी ही तूट भरून काढणे अशक्य आहे. हेही वाचा – Vaibhav Suryavanshi Record : वैभवचा वर्ल्ड रेकॉर्ड! अवघ्या १४ व्या वर्षी ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला कर्णधार भारताच्या वेळापत्रकात बदल होणार? बांगलादेश आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास बीसीसीआय आणि आयसीसीला स्पर्धेच्या ठिकाणांमध्ये बदल करावा लागेल. बांगलादेशचे सामने कोलकाता आणि मुंबईत होणार होते, ते आता रद्द होऊन दुसऱ्या देशात हलवावे लागतील. यामुळे काही प्रमाणात महसूल कमी होईल, पण आर्थिकदृष्ट्या बांगलादेशला होणारे नुकसान हे भारताच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त असेल.