ICC Penalty Pakistan : पाकिस्तानच्या गोलंदाजांना विकेट घेतल्याचा अति-उत्साह नडला! अब्बास अन् शहजादवर आयसीसीची मोठी कारवाई
ICC Penalty Pakistan : पाकिस्तानचे दोन वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास आणि खुर्रम शहजाद यांच्यावर आयसीसीने शिस्तभंगाची मोठी कारवाई केली आहे

Mohammad Abbas Khurram Shehzad Fined ICC Demerit Points WI vs PAK 1st Test : वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला पहिल्याच कसोटी सामन्यात मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वेस्ट इंडिजने पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा अवघ्या चार दिवसांत ९० धावांनी धुव्वा उडवला. या पराभवाच्या धक्क्यातून पाकिस्तान संघ सावरत असतानाच, संघातील दोन स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास (Mohammad Abbas) आणि खुर्रम शहजाद (Khurram Shehzad) यांच्यावर आयसीसीने (ICC) शिस्तभंगाची मोठी कारवाई केली आहे.
आक्रमक सेलिब्रेशन पडले करणे महागात!
पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना बाद केल्यानंतर आक्रमक हावभाव आणि चिथावणीखोर पद्धतीने जल्लोष करणे या दोघांनाही चांगलेच महाग पडले आहे. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. हे कलम बाद झालेल्या फलंदाजाला अपमानित करणे किंवा चिथावणी देणाऱ्या आक्रमक वर्तनाशी संबंधित आहे.
🚨 PAKISTANI PACERS PENALIZED 🚨
– Khurram Shehzad has been penalized 15% of his match fee + 1 demerit point.
– Muhammad Abbas has received an official reprimand + 1 demerit point.
Both the fast bowlers have been penalised by ICC for aggressive celebrations after dismissing… pic.twitter.com/i89iP40Skc
— Rayham. (@RayhamUnplugged) July 29, 2026
मॅच रेफरी जेफ क्रो यांनी सुनावलेल्या शिक्षेनुसार:
Khurram Shahzad and Mohammad Abbas have been sanctioned for breaching the ICC Code of Conduct during the first Test against the West Indies in Tarouba. Khurram has been fined 15% of his match fee, while Abbas received an official reprimand. pic.twitter.com/wjXdVimtil
— Usman (@jamilmusman_) July 29, 2026
- खुर्रम शहजाद: मॅच फीच्या १५ टक्के दंड आणि १ डिमेरिट पॉइंट.
- मोहम्मद अब्बास: अधिकृत ताकीद (Official Warning) आणि १ डिमेरिट पॉइंट.
दोन्ही खेळाडूंनी आपली चूक मान्य केल्याने औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही. गेल्या २४ महिन्यांतील ही त्यांची पहिलीच चूक असल्याने गंभीर कारवाई टळली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार २४ महिन्यांत ४ डिमेरिट पॉइंट झाल्यास खेळाडूवर बंदी (Suspension) घातली जाते.
दुसरा कसोटी सामना २ ऑगस्टपासून –
मालिकेत १-० ने मागे पडल्यानंतर आता पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी आणि अंतिम कसोटी २ ते ६ ऑगस्ट दरम्यान पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवली जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवण्याचे आव्हान पाकिस्तानी संघासमोर असेल.





