ICC Ban Reddy : क्रिकेट जगतात मोठी खळबळ! मॅच फिक्सिंग प्रकरणी ‘या’ आंतरराष्ट्रीय खेळाडूवर ICC कडून ८ वर्षांची बंदी
ICC Ban Reddy : अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बोडुगुम अखिलेश रेड्डी याला अँटी-करप्शनच्या तीन वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवून आयसीसीने त्याच्यावर तब्बल ८ वर्षांची बंदी घातली आहे.

ICC Bans USA Cricketer Bodugum Akhilesh Reddy For 8 Years Match Fixing : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचा (USA) आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बोडुगुम अखिलेश रेड्डी (Bodugum Akhilesh Reddy) याला अँटी-करप्शनच्या तीन वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवून आयसीसीने त्याच्यावर तब्बल ८ वर्षांची बंदी घातली आहे. या बंदीमुळे तो आता कोणत्याही प्रकारच्या अधिकृत क्रिकेटमध्ये भाग घेऊ शकणार नाही. या बंदीचा कालावधी २१ नोव्हेंबप २०२५ पासून लागू मानला जाईल, कारण याच दिवशी त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले होते.
अबू धाबी टी-१० लीगमध्ये घडला संपूर्ण प्रकार!
हा संपूर्ण प्रकार २०२५ च्या अबू धाबी टी-१० लीगदरम्यान घडला. या स्पर्धेत भ्रष्टाचार रोखण्याची जबाबदारी अमिरात क्रिकेट बोर्डाने (ECB) आयसीसीकडे सोपवली होती. तपासात अखिलेशचे फिक्सिंगचे प्रयत्न आणि पुरावे नष्ट करण्याचे कृत्य उघड झाले.
🚨 SUSPENDED 🚨
USA’s Bodugum Akhilesh Reddy has been banned from all cricket for 8 years after being found guilty of breaching 3 counts of the ICC Anti-Corruption Code.
The charges relate to the Abu Dhabi T10 2025 in the UAE.
The ban is backdated to 21 November 2025. pic.twitter.com/H8mzzBPKTL
— Cricbuzz (@cricbuzz) August 3, 2026
अखिलेश रेड्डीने मोडले आयसीसीचे ‘हे’ ३ मोठे नियम!
🚨 BREAKING 🚨
An 8-year ban is imposed on USA cricketer Bodugum Akhilesh Reddy for breaching three Anti-Corruption Code provisions related to match-fixing attempt during the 2025 edition of the Abu Dhabi T10 League. ❌#USA #ICC #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/4y18EL3QJp
— Sportskeeda (@Sportskeeda) August 3, 2026
आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटने (ACU) तपासाअंती अखिलेश रेड्डीला खालील तीन गंभीर कलमांखाली दोषी ठरवले आहे:
- आर्टिकल २.१.१ (मॅच फिक्सिंगचा प्रयत्न): त्याने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) झालेल्या ‘अबू धाबी टी-१० (2025)’ स्पर्धेत सामन्यांचे निकाल किंवा खेळ चुकीच्या पद्धतीने बदलण्याचा आणि फिक्स करण्याचा प्रयत्न केला.
- आर्टिकल २.१.४ (दुसऱ्या खेळाडूला फिक्सिंगसाठी प्रवृत्त करणे): त्याने दुसऱ्या एका खेळाडूला मॅच फिक्सिंगमध्ये सामील होण्यासाठी उकसवले, त्याची दिशाभूल केली आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला.
- आर्टिकल २.४.७ (तपासात अडथळा आणणे): त्याने तपासापासून वाचण्यासाठी आपल्या मोबाईल फोनमधील महत्त्वाचे मेसेज आणि डेटा डिलीट करून तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
अखिलेश रेड्डीने एप्रिल २०२५ मध्ये अमेरिकेसाठी ४ आंतरराष्ट्रीय टी-२० (T20I) सामने खेळले होते. विशेष म्हणजे, भ्रष्टाचारप्रकरणी बंदी ओढवून घेणारा तो अमेरिकेचा दुसरा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अमेरिकेचा फलंदाज एरॉन जोन्स यालाही आयसीसीचे नियम मोडल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते.





