IND vs PAK सामन्यांतील वादानंतर ICC ची मोठी कारवाई! रौफवर २ सामन्यांची बंदी, सूर्या-बुमराहवरही कारवाई

IND vs PAK Asia Cup Controversy : आशिया चषक २०२५चे जेतेपद भारतीय संघाने पटकावले असले तरी विजेत्या संघाला अद्याप स्पर्धेची ट्रॉफी देण्यात आलेली नाही. विविध वादांमुळे चर्चेत राहिलेल्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिन्ही सामन्यांमध्ये खेळाडूंमधील संघर्ष पाहायला मिळाले. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या प्रकरणांवर सुनावणी घेऊन पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाज हारिस रौफवर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंवरही कारवाई केली आहे.
आशिया चषक २०२५मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात तीन सामने खेळवले गेले, ज्यात भारतीय संघाने सर्व सामने जिंकले. मात्र, या तिन्ही सामन्यांमध्ये खेळाडूंमधील वाद उद्भवले. आता प्रथमच आयसीसीने या घटनांवर निर्णय जाहीर केला असून, १४ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यांसाठी रौफवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि साहिबझादा फरहान यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
हारिस रौफवर दोन सामन्यांची बंदी –
आयसीसीने भारत-पाकिस्तान यांच्यातील दोन सामन्यांमधील रौफच्या वागणुकीबाबत त्याला प्रत्येकी दोन डिमेरिट गुण दिले आहेत. त्यामुळे एकूण चार डिमेरिट गुण झाल्याने २४ महिन्यांच्या कालावधीत त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली. यामुळे रौफ पाकिस्तानच्या पुढील दोन सामन्यांसाठी (पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका वनडे मालिका) संघाबाहेर राहील.
- १४ सप्टेंबर सामना (सुपर ४ स्टेज): रौफला आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२१चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले. त्याच्या सामना शुल्काच्या ३०% दंड आणि दोन डिमेरिट गुण.
- २८ सप्टेंबर सामना (अंतिम फेरी): रिची रिचर्डसन यांच्या अध्यक्षतेखालील सुनावणीत रौफ पुन्हा कलम २.२१चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी. त्याला ३०% दंड आणि दोन अतिरिक्त डिमेरिट गुण; एकूण बंदी.
इतर खेळाडूंवर कारवाई –
- सूर्यकुमार यादव (भारत): १४ सप्टेंबर सामन्यात कलम २.२१चे उल्लंघन. ३०% सामना शुल्क दंड आणि दोन डिमेरिट गुण.
साहिबझादा फरहान (पाकिस्तान): याच कलमांतर्गत ३०% दंड. - जसप्रीत बुमराह (भारत): २८ सप्टेंबर अंतिम सामन्यात कलम २.२१चे उल्लंघन. अधिकृत इशारा आणि एक डिमेरिट गुण. त्याने शिक्षा मान्य केल्याने औपचारिक सुनावणीची गरज नव्हती.
- अर्शदीप सिंग (भारत): २१ सप्टेंबर सुपर ४ सामन्यात कलम २.६ (अश्लील हावभाव) अंतर्गत आरोप. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या चौकशीनंतर निर्दोष; कोणतीही शिक्षा नाही.
हेही वाचा – Sikandar Shaikh : कुस्तीपटू सिंकदर शेखला जामीन मंजूर
या कारवाईमुळे आशिया चषकातील भारत-पाक द्वंद्व आणखी चर्चेत आले आहे. आयसीसीच्या निर्णयामुळे पाकिस्तान संघाला फटका बसणार असून, भारतीय संघ विजेतेपदासह ट्रॉफीच्या प्रतीक्षेत आहे.





