ICC Test Team of The Year : आयसीसीकडून 2024 मधील सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर

कसोटी क्रिकेटसाठी 2024 हे वर्षे खूपच महत्त्वाचं होतं. या वर्षात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन संघ पात्र ठरले. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका या संघांचा समावेश आहे. मागच्या वर्षात सर्वोत्तम कागमिरी करणाऱ्या 11 खेळाडूंची निवड आयसीसीने टेस्ट टीम ऑफ द ईयरमध्ये केली आहे. या संघाची घोषणा आयसीसीकडून करण्यात आली आहे.
कोणाकोणाला मिळाले स्थान ?
यात भारताच्या तीन खेळाडूंना स्थान मिळालं. तर ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला या संघात स्थान देण्यात आले. एवढच नाहीतर त्याच्यावर खांद्यावर कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. तर भारताकडून जसप्रीत बुमराह, यशस्वी जयस्वाल आणि रवींद्र जडेजा या तिघांना संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच या संघात दक्षिण आफ्रिका १, इंग्लंडचे 4, न्यूझीलंडचे 2, श्रीलंकेच्या एका खेळाडूला स्थान देण्यात आले आहे.
Australia's Pat Cummins captains a star-studded ICC Men's Test Team of the Year for 2024 🙌
Details ➡️ https://t.co/49kUxxGqzZ pic.twitter.com/oemo8EKLgI
— ICC (@ICC) January 24, 2025
आयसीसीची टेस्ट टीम ऑफ द ईयर
पॅट कमिन्स (कर्णदार), यशस्वी जयस्वाल, बेन डकेट, केन विलियमसन, जो रूट, हॅरी ब्रूक, कामिंदु मेंडिस, जेमी स्मिथ (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मॅट हेनरी आणि जसप्रीत बुमराह.
आयसीसीकडून 2024 मधील सर्वोत्तम वनडे संघ जाहीर
आयसीसीने 2024 या वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ जाहीर केला आहे.आयसीसीच्या 2024 या वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघात एकूण 11 खेळाडूंचा समावेश आहे.आयसीसीच्या या संघात श्रीलंकेच्या सर्वाधिक 4 खेळाडूंचा समावेश आहे. पाकिस्तानच्या 3 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर विंडीजच्या एका खेळाडूला घेतलं आहे. तर श्रीलंकेच्या खेळाडूला कर्णधार करण्यात आले आहे.
आयसीसीची 2024 वर्षातील सर्वोत्तम वनडे प्लेईंग ईलेव्हन
चरिथ असलंका (कॅप्टन), सॅम अय्युब, रहमानुल्लाह गुरुबाझ, पाथुम निसांका,कुसल मेंडीस (विकेटकीपर), शेरफेन रुदरफोर्ड, अझमतुल्लाह ओमरझई,वानिंदु हसरंगा, शाहीन शाह अफ्रिदी, हरिस रौफ आणि अली गझनफर.





