ICC Mens ODI Team of the Year for 2024 : आयसीसीकडून 2024 मधील सर्वोत्तम वनडे संघ जाहीर

टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी गमवावी लागली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशा फरकाने विजय मिळवला. या पराभवामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधूनदेखील बाहेर पडावे लागले. ही जखम ताजी असताना आता टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
आयसीसीकडून 2024 मधील सर्वोत्तम वनडे संघ जाहीर
आयसीसीने 2024 या वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ जाहीर केला आहे.आयसीसीच्या 2024 या वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघात एकूण 11 खेळाडूंचा समावेश आहे.आयसीसीच्या या संघात श्रीलंकेच्या सर्वाधिक 4 खेळाडूंचा समावेश आहे. पाकिस्तानच्या 3 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर विंडीजच्या एका खेळाडूला घेतलं आहे. तर श्रीलंकेच्या खेळाडूला कर्णधार करण्यात आले आहे.
टीम इंडियाला मोठा धक्का
आयसीसीने या संघात 2024 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश केला आहे. आश्चर्य म्हणजे या संघात एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही आहे. टीम इंडियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
The best of the best in the 50-over format feature in the ICC Men’s ODI Team of the Year 2024 👕
Full team ➡️ https://t.co/lX2ymxAPcl pic.twitter.com/TJiVASsVHx
— ICC (@ICC) January 24, 2025
आयसीसीची 2024 वर्षातील सर्वोत्तम वनडे प्लेईंग ईलेव्हन
चरिथ असलंका (कॅप्टन), सॅम अय्युब, रहमानुल्लाह गुरुबाझ, पाथुम निसांका,कुसल मेंडीस (विकेटकीपर), शेरफेन रुदरफोर्ड, अझमतुल्लाह ओमरझई,वानिंदु हसरंगा, शाहीन शाह अफ्रिदी, हरिस रौफ आणि अली गझनफर.





