सैफचा मुलगा बॉलिवूडमध्ये करणार डेब्यू, पहिल्याच सिनेमात ‘या’ अभिनेत्रीसोबत झळकणार

Ibrahim ali khan Debut Movie: निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने आतापर्यंत त्याच्या चित्रपटामधून आलिया भट्ट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, अनन्या पांडे यासारख्या अनेक स्टार किड्सला संधी दिली आहे. आता या यादीमध्ये अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम अली खानचे देखील नाव जोडले जाणार आहे.
इब्राहिम अली खान डेब्यूसाठी सज्ज झाला आहे. मात्र, त्याचा पहिला चित्रपट थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. इब्राहिम ‘नादानियां’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असून, त्याच्यासोबत अभिनेत्री खुशी कपूर देखील प्रमुख भूमिकेत असणार आहे. इब्राहिम आणि खुशीचा ‘नादानियां’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
नेटफ्लिक्सने हटके पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे पोस्टर समोर आले असले तरीही प्रेक्षकांसाठी कधीपर्यंत उपलब्ध होईल, याची माहिती अद्याप नेटफ्लिक्सने दिलेली नाही.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच करण जोहरने नवीन स्टार तुमच्यासमोर येणार असल्याचे म्हणत इस्टाग्रामवर पोस्ट केली होती. याशिवाय त्याने अमृता, सैफचे कौतुक करणारी देखील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत इब्राहिमच्या डेब्यूची माहिती दिली होती.
‘नादानियां’ चित्रपटाची निर्मिती धर्मेटिक एंटरटेनमेंट अंतर्गत झाली आहे. करण जोहर, अपूर्वा मेहता, सोमेन मिश्रा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर शाउना गौतमने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, या हटके लव्ह स्टोरीच्या माध्यमातून लवकरच इब्राहिम आणि खुशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.





