IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरांच्या अडचणी आणखी वाढणार; आता चक्क नावातच आढळली मोठी चूक, पाहा….

IAS Pooja Khedkar : मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर मागच्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
पूजा खेडकर यांची सरकारकडून पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पूजा खेडकर यांचा आता नवीन खुलासा समोर आला आहे. पूजा खेडकरांच्या नावात विसंगती दिसून येत आहे.
2019 ला त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली होती. त्यावेळी यादीमध्ये त्यांचं नाव खेडेकर पूजा दिलीपराव असं आहे. शिवाय आडनावानं सुरुवात आहे. त्याचप्रमाणे दिलीपराव या नावात इंग्रजी स्पेलिंग ‘DEELIPRAO’ असं लिहिण्यात आलंय. 2021 च्या यादीत त्यांचं नाव पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं आहे.
म्हणजे आडनाव शेवटी आहे. वडिलांच्या नावाआधी मनोरमा आईचं नाव आहे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे वडिलांच्या नावाचं स्पेलिंग ‘DILIP’ हे सरळ लिहिण्यात आलंय. आता नावातील हे बदल का करण्यात आले? ते करत असताना आवश्यक प्रक्रिया म्हणजे ऍफिडेविट किंवा कोर्ट ऑर्डर आहे का? असे प्रश्न उपस्थित झालेत.
पहिल्यांदाच माध्यमांसमोर मांडली भूमिका…
माध्यमांशी बोलताना पूजा खेडकर म्हणाल्या की, ‘तुम्ही मला वेगवेगळे आरोप सांगितले आहेत, कमिटी मला जे काही प्रश्न विचारेल त्याचं मी पूर्ण स्पष्टीकरण देईन. मी सगळं कायदेशीर देईन. मी समितीसमोर साक्ष देईन. समिती जो निर्णय घेईन तो सगळ्यांनाच मान्य होईल, मीदेखील तो निर्णय मान्य करेन’, असं पूजा खेडकर म्हणाल्या आहेत.
‘त्या’ प्रश्नाचे उत्तर देणे टाळले
पोलीस आई-वडिलांचा शोध घेत आहेत, असा प्रश्न विचारला असता पूजा खेडकर यांनी उत्तर देणं टाळलं आहे. ‘त्या विषयावर मला काहीही माहिती नाही. मी त्यावर कमेंट करू शकत नाही. माझं काम प्रोबेशनर म्हणून इथे शिकायचं आहे आणि मी इकडे तेच करत आहे. बाकीच्या गोष्टींवर मी बोलू शकत नाही’, अशी प्रतिक्रिया पूजा खेडकर यांनी दिली आहे.
समितीचा निर्णय मान्य असेल
‘तुम्ही मला टेकनिकल गोष्टी विचारत आहात, त्यासाठीच त्यांनी तज्ज्ञांची समिती नेमली आहे. तज्ज्ञांच्या समितीला ठरवू दे. मी, तुम्ही किंवा सामान्य नागरिक यावर काहीही बोलू शकत नाही. सरकारमधले तज्ज्ञ यावर निर्णय घेतील, त्यानंतर सत्य समोर येईल.
समितीचा निर्णय सगळ्यांसमोर असेल. चौकशी काय सुरू आहे, समितीची माहिती गोपनीय ठेवावी लागते, या गोष्टीमध्ये मी तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही’, तसेच समिती जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे पूजा खेडकर म्हणाल्या आहेत.





