Haryana Result 2024: एक-एक मताची किंमत समजली; हरियाणात फक्त 32 मतांनी भाजपचा उमेदवार विजयी…

Haryana Election Result 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. भाजप येथे तिसऱ्यांदा सरकार बनवणार असल्याचे संकेत आहेत. भाजपला मोठा विजय मिळाला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये काॅंग्रेस सरकार बनवेल असा दावा करण्यात आला होता. मात्र ते सर्व एक्झिट पोल फोल ठरले आहेत. 90 जागांपैकी सद्यस्थितीत भाजप 50 जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे.
दरम्यान, एका जागेवर उमेदवाराला एका एका मताची किंमत समजली आहे. उचाना विधानसभेत भाजप उमेदवार देवेंद्र अत्री यांनी 32 मतांनी विजयाचा दावा केला. उचाना विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार देवेंद्र अत्री अत्यंत निकराच्या लढतीत विजयी झाले आहेत.
त्यांनी त्यांच्या विरोधी पक्षाचा केवळ 32 मतांच्या फरकाने पराभव केला, ही निवडणूक राजकारणातील महत्त्वाची घटना मानली जाते. या निवडणुकीत देवेंद्र अत्री यांना 42835 मते मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे बृजेंद्र सिंह यांना 42803 मते मिळाली आहेत.





