Actress Genelia D’Souza : अभिनेत्री जेनेलिया देशमुख सध्या तिच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दीपिका पदुकोणने ‘स्पिरिट’ चित्रपट सोडल्यापासून, इंडस्ट्रीमध्ये शिफ्ट टाइमिंग याबद्दल अनेक सेलिब्रेटींनी आपली मत व्यक्त केले आहे. अशातच अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने देखील आपली मत व्यक्त करत दिवसाला १० तास काम करत असल्याचे म्हटले आहे. एका मुलाखती दरम्यान जेनेलिया हिला आठ तासांच्या शिफ्ट टायमिंगबद्दल विचारलेल्या प्रश्नावर तिने मी आठ नाही तर दररोज १० तास काम करते, असे उत्तर दिले आहे. हे सगळं जुळवून घेत असल्याचे देखील अभिनेत्रीने म्हटले आहे. सध्या तिने केलेल्या विधानाची बॅालीवूडमध्ये चर्चा होत आहे. तसेच दिग्दर्शक तिचे कामाचे तास वाढवतो तेव्हा ती जुळवून घेते. जेनेलिया म्हणाली, ‘हे कठीण आहे पण अशक्य नाही. मी दिवसाला १० तास काम करते आणि असे काही दिवस असतात जेव्हा दिग्दर्शक मला ते ११ किंवा १२ तासांपर्यंत काम करण्यास सांगतात, असे देखील तिने म्हटले आहे. दीपिकाच्या शिफ्ट टायमिंग आणि इतर मागण्यांमुळे स्पिरीट या चित्रपटातून दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी तिला काढले. यानंतर बॅालीवूडमध्ये शिफ्ट टायमिंगचा मुद्दा समोर आला आहे. जेव्हा तुमच्याकडे एक किंवा दोन दिवस असतात, जेव्हा तुम्हाला जास्त काम करावे लागते. त्यासाठी परस्पर समज हे देखील अत्यंत महत्वाचे असल्याचे देखील जेनेलिया हिने नमूद केले आहे. या महिन्यात सितारे जमीन पर या चित्रपटात जेनेलिया दिसणार आहे. नुकत्याच या चित्रपटाविषयी तिने झुमशी संवाद साधला त्यावेळी ती बोलत होती. हेही वाचा:मोठ्या अपघातानंतर पुन्हा तेच घडलं! अहमदाबाद-लंडन एअर इंडियाचे विमान रद्द