Prajakta Mali Post : ”मी आता लवकरच..”; प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी, म्हणाली ”फिल्म इंडस्ट्री सोडून..”
Prajakta Mali Post : अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Prajakta Mali Post : मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीची ओळख आहे. तिने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. चाहते नेहमी तिच्या आगामी प्रोजक्टविषयी उत्सुक असतात. Prajakta Mali Post
प्राजक्ताचा सोशल मिडियावर देखील सतत वावर असतो. ती नेहमी पोस्टमुळे चर्चेत असते. काही फोटोशूटचे फोटोही ती शेअर करत असते. आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्राजक्ताने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. Prajakta Mali Post

marathi actress prajakta mali
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅपिनेस प्रोग्रामची शिक्षिका होण्याचे सर्टिफिकेट तिने मिळवले असून, त्यामुळे ती खूप आनंदात आहे. याबद्दल तिने पोस्ट लिहिली आहे.
हेही वाचा : Jannat Jubair: पनवेल हायवेवर जन्नत जुबैर आणि अयान जुबैरवर हल्ला; चाहत्यांमध्ये खळबळ, सध्या दोघेही सुरक्षित
”गुरूकृपेने… आज अत्यंत आनंदाने सांगू इच्छितो/इच्छिते की, मी आता ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ कोर्सची ‘हॅपिनेस प्रोग्राम’ शिक्षिका बनले आहे. गेले १५ दिवस मी शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर अत्यंत खडतर आणि सखोल प्रशिक्षण घेतले. फोनचा वापर नाही की बाहेरचे जेवण नाही; पूर्णपणे स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याचा हा काळ होता.” Prajakta Mali Post
‘पद्मसाधना: दररोज पहाटे केलेली ‘पद्मसाधना’… ज्यांनी अनुभवली आहे, त्यांनाच या साधनेचे महत्त्व ठाऊक आहे. अशी भावना तिने व्यक्त केली.
या प्रवासात अशा अनेक गोष्टी अनुभवल्या ज्या शब्दांत मांडणे कठीण आहे. मी आता लवकरच स्वतःच्या वर्गांना सुरुवात करणार आहे, त्यामुळे संपर्कात राहा!” असेही तिने लिहिले आहे. Prajakta Mali Post
View this post on Instagram
याच पोस्टमध्ये तिने ”तळटीप – अजिबात फिल्म इंडस्ट्री सोडून कुठेही जाणार नाहीये.”, असेही चाहत्यांना स्पष्ट केले आहे.
प्राजक्ताने टेलिव्हिजन इंडस्ट्रीद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर तिने अनेक भूमिका साकारल्या. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ती महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचे सूत्रसंचालन केले आहे.
हेही वाचा : Sanjay Raut : शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची जळजळीत टीका; म्हणाले “गरज म्हणून तिथं तुम्हाला ठेवलं आहे”




