Shehnaaz Gill: “…शेवटच्या श्वासापर्यंत सरंक्षण करेन”, शहनाज गिलसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर राघवने सोडले मौन
Shehnaaz Gill: डेटिंगच्या चर्चांवर शहनाज गिलनेही प्रतिक्रिया दिली

Shehnaaz Gill: अभिनेता राघव जुयाल आणि अभिनेत्री शहनाज गिल हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. दोघांचा एकमेकांचा एकत्र व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात राघव पापाराझींपासून शहनाजचे सरंक्षण करत असल्याचे दिसून आले. या व्हिडिओवर आणि डेटिंगच्या चर्चांवर राघवने आपली प्रतिक्रिया देत सत्य सांगितले आहे.
एका मुलाखतीदरम्यान राघव म्हणाला, “माझ्या आई-वडिलांनी मला असा माणूस बनवले आहे जो गरजेच्या वेळी महिलांच्या रक्षणासाठी नेहमी तत्पर असेल. जर माझ्यासोबत कोणतीही महिला असेल आणि काही लोकांनी तिला त्रास दिला, तर मी शांतपणे उभा राहून पाहू शकत नाही. माझे मित्र, कुटुंबीय आणि माझ्याबरोबर असलेल्या कोणत्याही महिलेचं मी शेवटच्या श्वासापर्यंत सरंक्षण करेन. ती शहनाज असो किंवा इतर कोणतीही महिला हा माझा स्वभाव आहे.”
राघव पुढे म्हणाला की, “जसा स्त्रीशक्तीचा आदर केला जातो, तसेच पुरुषांची जबाबदारी आणि मूल्यांनाही महत्त्व दिले पाहिजे. नृत्य, माझी कला आणि माझा स्वभाव स्त्रीशक्तीचे पैलू दाखवतात, पण जेव्हा परिस्थिती तशी असते, तेव्हा महिलांचा सन्मान करणे, त्यांचं संरक्षण करणे, बहिणी आणि मित्रांच्या पाठीशी उभं राहणे, हे माझ्या आई-वडिलांनी दिलेले संस्कार पुढे येतात. अशा परिस्थितीत मी माझ्या सार्वजनिक प्रतिमेचा कधीच विचार करत नाही.”
राघवने असेही सांगितले की, “कोणत्याही महिलेला त्रास होत असेल, तर ती कोण आहे, याने मला काही फरक पडत नाही. अशा वेळी परिस्थिती कशी हाताळायची, हे मला माहीत आहे आणि पुढे येण्याबाबत माझ्या मनात कोणताही संकोच नसतो. त्या क्षणी मी माझी स्टार इमेज किंवा लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, याचा विचार करत नाही.”
दरम्यान, डेटिंगच्या या चर्चांवर शहनाज गिलनेही आपली प्रतिक्रिया दिली होती. शहनाजने राघवला एक खूप चांगला मित्र असल्याचे म्हटले होते.
हेही वाचा:






