‘मी भाजप सोबतच..कुठल्याही पक्षात जाणार नाही’ – पंकजा मुंडे

Updated On:

मुंबई – भाजप नेत्या पंकजा मुंडे कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पंकजा यांनी काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. त्यांनी यासाठी दोनवेळा दिल्ली दौरे केल्याचेही वृत्त आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बंडखोरीनंतर आता राज्याच्या राजकारणात आणखी एक स्फोट होण्याची शक्‍यता आहे.

 

 

यावर आता ‘मी भाजप सोबतच..कुठल्याही पक्षात जाणार नाही’ असं स्पष्ट सांगत पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या पुढे म्हणाल्या मला सोनिया गांधी राहुल गांधी यांना कधीच भेटलेले नाही. माझी गांधी कुटूंबियात ओळख सुद्धा नाही. माझ्याबाबत चुकीची अफवा पसरवली जात आहे. जनतेला आता पाडापाडीच्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. असे देखील पंकजा मुंडे यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या जेव्हा जेव्हा मला तिकीट भेटले नाही त्यावेळी प्रतिक्रिया दिली नाही, मी नाराज नाही पण दुखी आहे. अनेकदा डावलुनही मी कधीच नाराजी व्यक्त केली नाही असं मत मुंडे यांनी पत्रकार परिषदेत मांडले आहे, भाजप फुटेल असा दिवस येऊ नये अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.

 

तत्पूर्वी,पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस वरिष्ठांच्या घेतलेल्या भेटीला कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. पंकजांनी या भेटीत पक्ष प्रवेशाच्या मुद्यावर विस्तृत चर्चा केली. सांगलीच्या एका बड्या नेत्याकडून पंकजा मुंडेंसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाना पटोलेंचे कानावर हात
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणी आपल्या कानावर हात ठेवले आहेत. पंकजा मुंडेंच्या कॉंग्रेस प्रवेशासंबंधीची मला कोणतीही माहिती नाही. पण पंकजाताई कॉंग्रेसमध्ये येणार असतील, तर त्यांचे स्वागतच आहे, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांना कॉंग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पंकजा मुंडे या आमच्या भगिणी आहेत. त्यांच्यावर अन्याय होत आहे. यामुळे त्यांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण झाली असून, त्यातूनच त्यांनी भाजप आपला पक्ष नसल्याचे विधान केले आहे. भाजपच्या उभारणीत त्यांच्या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. त्यांच्यासाठी कॉंग्रसचे दरवाजे कायम खुली आहेत, असे थोरात म्हणाले होते.

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार तातडीने दिल्लीत दाखल; मोठी राजकीय घडामोड घडणार?

2026-04-01 22:36:25

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार तातडीने दिल्लीत दाखल; मोठी राजकीय घडामोड घडणार?

Housing Projects: महाराष्ट्रात 1060 गृहप्रकल्पांना मिळाली मंजुरी

2026-04-01 22:35:52

Housing Projects: महाराष्ट्रात 1060 गृहप्रकल्पांना मिळाली मंजुरी

Jyotiba Chaitra Yatra 2026 : जोतिबाच्या नावानं चांगभलं..! चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने जोतिबाचा डोंगर दुमदुमला

2026-04-01 21:53:32

Jyotiba Chaitra Yatra 2026 : जोतिबाच्या नावानं चांगभलं..! चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने जोतिबाचा डोंगर दुमदुमला

Koregaon Bhima News : शिरूर तालुक्याला झेडपी अध्यक्षपद नाही, किमान सभापतीपद द्या.!

2026-04-01 19:15:57

Koregaon Bhima News : शिरूर तालुक्याला झेडपी अध्यक्षपद नाही, किमान सभापतीपद द्या.!

Dattatray Bharne : युरिया, खतांचा पुरेसा साठा निश्चित करा; मंत्री दत्तात्रय भरणे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

2026-04-01 19:11:00

Dattatray Bharne : युरिया, खतांचा पुरेसा साठा निश्चित करा; मंत्री दत्तात्रय भरणे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश