“मी कधीही ‘छावा’, ‘द कश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट करणार नाही;” जॉन अब्राहम असं का म्हणाला?

John Abraham | बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयासह खास अंदाजासाठी तो ओळखला जातो. लवकरच तो ‘तेहरान‘ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी झी5 वर प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर विकी कौशल अभिनीत ‘छावा’ हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. मात्र, या दोन्ही चित्रपटांना टीकेला सामोरे जावे लागले होते. नुकतेच एका मुलाखतीत जॉनला बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या छावा आणि द काश्मीर फाइल्स सारखे चित्रपट बनवण्याचा मोह वाटतो का? असा सवाल करण्यात आला होता.
त्यावर जॉन म्हणाला की, “मी छावा पाहिलेला नाही, पण मला माहित आहे की लोकांना ते आवडले आहे आणि द काश्मीर फाइल्स देखील. जेव्हा अति राजकीय वातावरणात लोकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने चित्रपट बनवले जातात आणि अशा चित्रपटांना प्रेक्षक मिळतात, तेव्हा ते माझ्यासाठी भीतीदायक आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर, नाही….मी कधीही मोहात पडलेलो नाही आणि मी कधीही अशा प्रकारचे चित्रपट बनवणार नाही.” John Abraham |
मी राजकीय नाही….
यावेळी जॉन अब्राहमने राष्ट्रवादावर आधारित चित्रपटांबद्दल आपले विचार मांडले आहेत. जॉन म्हणाला की, “मी ना उजव्या विचारसरणीचा आहे, ना डाव्या विचारसरणीचा. मी राजकीय नाही. मला ज्या गोष्टीची काळजी आहे, ती म्हणजे उजव्या विचारसरणीच्या चित्रपटांना जास्त प्रेक्षक मिळतात आणि जेव्हा तुम्ही एक चित्रपट निर्माता म्हणून स्वतःला विचारता की मी कोणत्या मार्गाने गेले पाहिजे.” John Abraham |
“आपल्याला सेन्सॉरशिपची आवश्यकता आहे, परंतु ज्या पद्धतीने त्यावर देखरेख केली गेली आहे ते थोडे प्रश्नचिन्ह आहं. ते आमच्यासोबत चांगले आहेत, परंतु मी माझे चित्रपट ज्या पद्धतीने बनवले आहेत त्याबद्दल मी देखील जबाबदार आहे. मी उजव्या किंवा डाव्या विचारसरणीचा नाही. मी अराजकीय आहे,” असे स्पष्ट भूमिका जॉनने मांडली. John Abraham |
जॉन अब्राहम ‘तेहरान’ चित्रपटात एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अरुण गोपालन दिग्दर्शित या चित्रपटातील जॉन अब्राहमचा जबरदस्त लूक अनेकांच्या पसंतीस पडत आहे. २०१२ मध्ये दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटावर हा चित्रपट आधारित आहे. या घटनेमुळे इस्राईल, इराण आणि भारत या देशांमध्ये तणाव वाढला होता. या पार्श्वभूमीवरची ही कथा थरारक असणार आहे.
हेही वाचा :
शेअर बाजाराची जोरदार सुरुवात ! सेन्सेक्सची २८९ अंकांची उसळी ; निफ्टीनेही २४००० चा टप्पा ओलांडला





