Deepali Sayyad : “करिअर संपवू…”; दिपाली सय्यद यांना धमकीचे फोन; एकनाथ शिंदेंची भेट घेणार
Deepali Sayyad : विशेष म्हणजे, काही फोन राजकीय व्यक्तींकडून आल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाने आता केवळ चित्रपटसृष्टीपुरते मर्यादित न राहता राजकीय रंगही घेतला आहे.

Deepali Sayyad : नाशिकमधील चर्चित अशोक खरात प्रकरणावर आधारित तयार होत असलेल्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर समोर आले. तर चित्रपटात रुपाली चाकणकरांची भूमिका अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद साकारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून, आपल्याला सतत धमकीचे फोन येत असल्याचा गंभीर आरोप करत दिपाली सय्यद यांना मोठा खुलासा केला आहे.
“हा चित्रपट करू नकोस, नाहीतर परिणाम वाईट होतील,” अशा आशयाचे फोन येत असल्याचे दिपाली सय्यद यांनी माध्यमांसमोर सांगितले. विशेष म्हणजे, काही फोन राजकीय व्यक्तींकडून आल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाने आता केवळ चित्रपटसृष्टीपुरते मर्यादित न राहता राजकीय रंगही घेतला आहे.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटात दिपाली सय्यद एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर आधारित भूमिका त्या साकारत असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. मात्र, याबाबत स्पष्ट भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.
हेही वाचा : Tamarind Panna: कडक उन्हात उष्माघातापासून बचाव करणार ‘चिंचेचं पन्हं’; शरीराला देईल त्वरित थंडावा
दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत यांनी अशोक खरात प्रकरणावर आधारित हा चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. “आता सर्व काही उघड होईल” ही चित्रपटाची टॅगलाइन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Deepali Sayyad)
दिपाली सय्यद यांनी सांगितले की, ‘बिग बॉस’च्या घरात असल्यामुळे गेल्या काही महिन्यांत बाहेर काय सुरू आहे याची माहिती नव्हती. मात्र पटकथा वाचल्यानंतर या प्रकरणाची गंभीरता लक्षात आली. “जनतेसमोर सत्य येणं गरजेचं आहे,” असे त्या म्हणाल्या.
एकनाथ शिंदेंची भेट घेणार (Deepali Sayyad)

Deepali Sayyad : “करिअर संपवू…”; दिपाली सय्यद यांना धमकीचे फोन; एकनाथ शिंदेंची भेट घेणार
दरम्यान, धमकीच्या फोनप्रकरणी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. फोन करणाऱ्यांची नावे वरिष्ठांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय महिला नेत्यांनीही धमकी दिली असल्याचा दावा दिपाली सय्यद यांना केला आहे.
या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून, २ ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील, असा दावा निर्मात्यांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा : Rinku Rajguru : “…आकाशलाच विचारायला हवं!”; चाहत्याच्या ‘त्या’ प्रश्नावर रिंकु राजगुरुने दिले खास उत्तर





