Sanju Samson : ‘२१ वेळा शून्यावर आऊट झालास तरच बाहेर…!’, सूर्या आणि गंभीरच्या शब्दांनी संजूला दिली नवी उभारी

Sanju Samson statement on Gautam Gambhir and Surya : विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनने टी-20 क्रिकेटमधील त्याच्या यशाचे श्रेय भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांना दिले आहे. सॅमसनने सांगितले की, गंभीरने त्याला सांगितले होते की, जोपर्यंत तो 21 वेळा शून्यावर बाद होत नाहीत, तोपर्यंत त्याला संघातून वगळले जाणार नाही. भारताने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले आणि सूर्यकुमार यादवला कर्णधार नियुक्त केले. यावेळी सॅमसनला सलामीवीर म्हणून संधी मिळाली.
‘कर्णधाराकडून असे ऐकून मला खूप आनंद झाला’ –
सॅमसनने माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, “टी-20 विश्वचषकानंतर अचानक बदल झाले. गौतम प्रशिक्षक झाले आणि सूर्या कर्णधार बनला. मी आंध्रात दुलीप ट्रॉफीचा सामना खेळत होतो, तेव्हा सूर्या दुसऱ्या संघाकडून खेळत होता. त्याने मला सांगितले की, तुझ्यासाठी मोठी संधी येत आहे. आमच्याकडे सात सामने आहेत आणि मी तुला सातही सामने सलामीवीर म्हणून खेळवणार आहे. कर्णधाराकडून असे ऐकून मला खूप आनंद झाला.”
’21 वेळा शून्यावर बाद झालास, तरच संघातून बाहेर’ –
Sanju Samson said, “Gautam Gambhir once came to me and asked what happened. I told him I couldn’t convert my starts. He told me, ‘even if you score 21 ducks, I won’t drop you’. I really felt safe, which helped me to score runs after that”. (Ravi Ashwin YT). pic.twitter.com/Ne8vVHCN9W
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 9, 2025
संजू सॅमसन पुढे म्हणाले, “श्रीलंकेत दोन सामने खेळलो, पण धावा करू शकलो नाही. ड्रेसिंग रूममध्ये मी थोडा निराश होतो. तेव्हा गौती भाई माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘काय झालं?’ मी म्हणालो, ‘खूप दिवसांनी संधी मिळाली, पण मी ती साधली नाही.’ त्यावर ते म्हणाले, ‘मग काय झालं? तू 21 वेळा शून्यावर बाद झालास, तरच मी तुला संघातून बाहेर काढेन.’ कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या या बोलण्याने माझा आत्मविश्वास वाढला आणि मैदानावर चांगली कामगिरी करण्यास मला मदत झाली.”
संजू सॅमसनचे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
संजू सॅमसनने भारतासाठी आतापर्यंत 42 टी-20 सामन्यांमध्ये 25.32 च्या सरासरीने 861 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली आहेत. सध्या तो 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान यूएईमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी निवडीच्या शर्यतीत आहे. सॅमसनने कबूल केले की, टी-20 मधील पदार्पणानंतर वारंवार संघातून आत-बाहेर होत असल्याने तो निराश होता. मात्र, गंभीर आणि सूर्यकुमार यांच्या आगमनानंतर त्याच्यासाठी परिस्थिती सुधारली आहे.





