मुंबई : साहेबांना जेवणावरून उठवून अटक करण्याचा तो क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. ज्या दिवशी परतफेड करेन, त्याच दिवशी तो व्हिडिओ डिलीट करेन. कुणालाही सोडणार नाही, असा थेट इशारा मंत्री नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. सगळ्यांचा हिशोब होणार. कारण राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, ते कुठेही सुटत नाहीत. एवढं विश्वासाने मी आपल्याला सांगतो, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले. Uddhav Thackeray | केंद्रात मंत्री असताना नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक विधान केलं होतं. त्यानंतर नारायण राणे यांना जेवत असताना पोलिसांनी अटक केली होती. त्या घटनेचा उल्लेख करत कॅबिनेट नितेश राणे यांनी आता परतफेड करण्याची भाषा केली आहे. वडील खासदार नारायण राणे यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखमध्येही अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. Nitesh Rane News | नेमकं काय म्हणाले नितेश राणे? नितेश राणे म्हणाले, नारायण राणेंना अटक केलेला जो क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. ज्या दिवशी परत फेड करेन त्याच दिवशी डिलीट मारणार. कुणालाच सोडणार नाही. तो क्षण टप्प्याटप्याने जवळ आलेला आहे. कोण कुठे जात नाही, सर्वांना हिशेब इथेच होणार आहे. राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला कुणीही सुटणार नाहीत, असं नितेश राणे यांनी यावेळी बोलून दाखवलं. Nitesh Rane | दीपक केसरकर यांचं आमच्याशी कधीच वैर नव्हतं पुढे बोलताना म्हणाले, दहा वर्षाच्या प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी अनुभवायला, पाहायला मिळाल्या. सिंधुदुर्गाचे पालकमंत्री दीपक केसरकर असताना त्याच्या आशीर्वादाने दोडामार्ग जेल देखील पाहिलं आहे. मात्र त्यांनी लोकसभेला जी आम्हाला साथ दिली, त्यामुळे ते सगलं जुनं पुसलं गेलं आहे. तिसऱ्या कोणालातरी खुश करण्यासाठी त्यांनी हे केलं होतं, त्यांचं आमच्याशी कधीच वैर नव्हतं, असं देखील नितशे राणेंनी यावेळी म्हटलं. Deepak Kesarkar | नारायण राणे यांचं वक्तव्य काय? महाडमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे म्हणाले होते की, स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्य दिन कोणता माहिती नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती, असे विधान नारायण राणे यांनी केलं होतं. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन त्यांना जेवण करत असतानाच अटक करण्यात आली होती. Narayan Rane |