Rohit Sharma : ‘मला वाटतं शुबमन आणि…’, रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया सोडण्यापूर्वी गौतम गंभीर काय म्हणाला?

Gautam Gambhir Praises Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 2-1 ने मालिका खिशात घातली. या मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्माने शानदार शतकीय खेळी (125 चेंडूत नाबाद 121) करत भारताला 9 गडी राखून दमदार विजय मिळवून दिला. या विजयासह रोहितने आपल्या निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देताना आपण अजूनही अव्वल फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले. यानंतर कोच गौतम गंभीरने रोहित शर्मासह सर्व खेळाडूंचे कौतुक केले.
या मालिकेत सर्वाधिक 202 धावा करणाऱ्या रोहितला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच, भारतीय ड्रेसिंग रूममध्ये त्याला ‘इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द सीरिज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिडनीतील सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 46.4 षटकांत 236 धावांत गुंडाळले. यानंतर, 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने सलामीवीर शुबमन गिलसह (26 चेंडूत 24) पहिल्या गड्यासाठी 69 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहलीसह (81 चेंडूत नाबाद 74) दुसऱ्या गड्यासाठी 168 धावांची अखंड भागीदारी करत भारताला विजयापर्यंत पोहोचवले.
गंभीरकडून रोहितसह सर्व भारतीय संघाचं कौतुक –
An impressive all-round outing, applauded by inspiring words from Head Coach @GautamGambhir 🙌 🗣
🎥 A reflection of the 3️⃣rd #AUSvIND ODI, followed by a presentation of the 𝗜𝗺𝗽𝗮𝗰𝘁 𝗣𝗹𝗮𝘆𝗲𝗿 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗦𝗲𝗿𝗶𝗲𝘀 medal 🏅 #TeamIndia | @ImRo45…
— BCCI (@BCCI) October 27, 2025
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने ड्रेसिंग रूममधील एका व्हिडीओ संदेशात रोहित आणि कोहलीच्या खेळीचे कौतुक केले. गंभीर म्हणाले, “शुभमन आणि रोहित यांच्यातील सलामीची भागीदारी आणि त्यानंतर रोहित-विराट यांची शानदार भागीदारी यामुळे भारताने सामना सहज जिंकला. रोहितने आणखी एक शतक ठोकले आणि विराटने त्याला उत्तम साथ दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना आपण किती प्रभावी होऊ शकतो, हे या सामन्यात दिसले.” यानंतर गंभीरने नवोदित वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या कामगिरीचेही कौतुक केले.
ही फक्त सुरुवात आहे, शेवट नाही –
हर्षितने 8.4 षटकांत 39 धावांत 4 गडी टिपले. गंभीर म्हणाला, “ऑस्ट्रेलियाने 10 षटकांत 1 बाद 63 धावांची सुरुवात केली होती, पण त्यांना 236 धावांत रोखणे हा गोलंदाजांचा शानदार प्रयत्न होता. हर्षितचा स्पेल अप्रतिम होता. त्याला माझा सल्ला आहे की, विनम्र राहा, मेहनत करत राहा. ही फक्त सुरुवात आहे, शेवट नाही.” रोहित आणि कोहली रविवारी भारतात परतले, तर उर्वरित भारतीय संघ पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात थांबला आहे. ही मालिका बुधवारपासून कॅनबेरामध्ये सुरू होणार आहे.





