Akshaye Khanna | Vinod Khanna : ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकणारा अभिनेता अक्षय खन्ना म्हणतो की ‘त्याला कधीही त्याचे वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम करायचे नव्हते आणि तो कधीही अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करू इच्छित नाही.’ असं स्वतः अभिनेता म्हणाला आहे. अक्षयची गणना बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये केली जाते. एका जुन्या मुलाखतीत अक्षय म्हणाला होता की, त्याचे वडील विनोद खन्ना आणि अभिनेते अमिताभ बच्चन सारख्या कलाकारांची पडद्यावर इतकी मजबूत उपस्थिती आहे की त्यांच्यासोबत काम करणे कठीण आहे. अक्षय म्हणाला, “माझ्या वडिलांसारखा पडद्यावर प्रभाव पाडणे सोपे नाही. फक्त काही लोकांमध्येच हा गुण असतो आणि माझ्याकडे तो नाही.” अशी भावना त्याने व्यक्त केली. अक्षयने बायोपिक चित्रपटांबद्दलही सांगितले. तो म्हणाला की, खऱ्या व्यक्तीची भूमिका साकारणे खूप आव्हानात्मक आहे कारण ते अगदी अचूकपणे करावे लागते. २००७ मध्ये आलेल्या ‘गांधी, माय फादर’ या चित्रपटात अक्षयने महात्मा गांधींचा मुलगा हिरालाल गांधी यांची भूमिका साकारली होती. अलीकडेच २०२५ मध्ये आलेल्या ‘छावा’ चित्रपटात त्यांनी मुघल शासक औरंगजेबाची भूमिका साकारली होती, जो ब्लॉकबस्टर ठरला. अक्षय कुमारची कारकीर्द अक्षय शेवटचा ‘छावा’मध्ये विकी कौशल आणि रश्मिका मंदान्नासोबत दिसला होता. आता तो रणवीर सिंगसोबत ‘धुरंधर’ चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे चित्रीकरण सुरू आहे. हा चित्रपट अॅक्शन, ड्रामा आणि सस्पेन्सने भरलेला असेल. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अक्षयची सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग लाखोंच्या घरात आहे.