Sonali Kulkarni : देशभरात भारतीय रेल्वेचं जाळ मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आहे. गेल्या काही काळापासून भारतीय रेल्वेच्या गाड्यांची संख्याही वाढलेली आहे. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही व्हिडीओतून अनेक धक्कादायक घटना रेल्वेत घडल्याच्या समोर येत असतात. यामुळे रेल्वेने प्रवास करण्यावर अनेकांकडून प्रश्न निर्माण केले जातात. असं असलं तरी मोठ्या प्रमाणावर प्रवासी रेल्वेचा प्रवास निवडतात हेही तितकचं खरं आहे. मात्र, एका मराठमोळ्या अभिनेत्रीने वेळ वाचविण्यासाठी रेल्वेने प्रवास केला असून, तिने आपला अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. तिने शेअर केलेला व्हिडीओ सेंट्रल रेल्वेने रिशेअर केला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सोलापूर ते मुंबई हा प्रवास सिद्धेश्वर एक्सप्रेसने केला आहे. तिने एक व्हिडीओ तिच्या एक्स अकाऊंवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ १४ सप्टेंबरचा आहे. सोनालीने व्हिडीओच्या माध्यमातून भारतीय रेल्वे सेवेवर प्रेम व्यक्त केलं आहे. खूप दिवसांनी ट्रेनमधून चाललेलयं मस्त वाटतयं असं तिने व्हिडीओत म्हटलं आहे. सोनाली कुलर्णी हिने वेळ वाचवण्यासाठी भारतीय रेल्वे सेवा वापरली. सोलापूर ते मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असताना तिने आपला अनुभव शेअर केला आहे. भारतीय रेल्वे सदैव तुमच्या सेवेत असं सेंट्रल रेल्वेने रिशेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे. अभिनेत्री @sonalikulkarni हिने वेळ वाचवण्यासाठी भारतीय रेल्वे सेवा वापरली. सोलापूर ते मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असताना तिने आपला अनुभव शेअर केला आहे. भारतीय रेल्वे सदैव तुमच्या सेवेत 🙏🏻#CentralRailway #IndianRailway #Sonalikulkarni pic.twitter.com/sDs2Htzzfy — Central Railway (@Central_Railway) September 14, 2025 काय म्हणाली सोनाली कुलकर्णी? हॅलो तुम्हाला सगळ्यांना माहितीये…. आय लव्ह इंडियन ट्रेन्स! मी भारतीय रेलेची प्रचंड मोठी फॅन आहे. मी आता सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये आहे… खूप रात्र झाली असून सोलापूरहून आम्ही मुंबईला निघालो आहे. किती मस्त वाटतयं…. आता माझ्याबरोबर आहेत माझे टीम मेंबर सायली विद्या आणि सुजित मला खूप मस्त वाटतयं…. मी खूप दिवसांनी ट्रेनमधून चाललेय…. भारतीय रेल जिंदाबाद….असं सोनाली म्हणाली आहे. हेही वाचा : हार्दिक पांड्याची लव्ह स्टोरी पुन्हा सुरू; नताशा, जास्मिन यांच्यानंतर प्रसिद्ध मॉडेलच्या पडला प्रेमात