हार्दिक पांड्याची लव्ह स्टोरी पुन्हा सुरू; नताशा, जास्मिन यांच्यानंतर प्रसिद्ध मॉडेलच्या पडला प्रेमात

Hardik Pandya Mahieka Sharma Dating Rumors | भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मागील काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आता पुन्हा हार्दिक नव्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टेनकोविकसोबत घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर हार्दिक आणि जास्मिन वालिया यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता. यानंतर आता अभिनेत्री माहिका शर्मा हिच्यासोबत हार्दिक याच्या नावाची चर्चा सुरु आहे.
घटस्फोटानंतर पुन्हा हार्दिक एका नव्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हार्दिकच्या नव्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. व्हिडीओमध्ये सेल्फीमध्ये हार्दिक याची अस्पष्ट झलक दिसत आहे. त्यानंतर एका पोस्टमध्ये जर्सी नंबर 33चा उल्लेख करण्यात आला आहे. जे बहुतेकदा हार्दिक पांड्याशी जोडलं जातं.
त्यानंतर माहिका आणि हार्दिक एकमेकांना फॉलो करत असल्याचे चाहत्यांच्या लक्षात आले. सध्या हार्दिक आणि माहिका यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. पण दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. Hardik Pandya Mahieka Sharma Dating Rumors |
View this post on Instagram
कोण आहे माहिका शर्मा ?
माहिका ही प्रसिद्ध मॉडेल आहे. तिने अनेक म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट फिल्म आणि ब्रँडसोबत काम केलं आहे. तिला सर्वोत्तम मॉडेल म्हणून Indian Fashion Awardsने गौरविण्यात आले होते. शिवाय भारतातील प्रसिद्ध मॅगझिनवरही ती झळकली होती. तिने विद्यापीठात इकॉनॉमिक्स व फायनान्सचे शिक्षण घेतले. तिच्या पालकांना ती डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावी अशी अपेक्षा होती. मात्र माहिकाने करिअर मॉडेलिंग किंवा अभिनयात घडवण्याचा निर्णय घेतला.
गुजरात आणि दिल्लीमधील स्थानिक स्पर्धांमधून तिने सुरुवात केली. मॉडेलिंगसोबतच तिला फिटनेसचीही आवड असून कॉलेजनंतर तिने योगा टीचर ट्रेनिंग पूर्ण केले. महिकाच्या प्रोफेशनल वृत्तीमुळे ती भारतातील आघाडीच्या मॉडेल्समध्ये गणली जाते. सोशल मीडियावर माहिका कायम सक्रिय असते. Hardik Pandya Mahieka Sharma Dating Rumors |
हार्दिक आणि जास्मिन वालियाचं नातं चर्चेत
याआधी हार्दिक आणि जास्मिन वालियाचं नातं खूप चर्चेत आलं होतं. दोघांना सुट्टीवर एकत्र स्पॉट करण्यात आले. जास्मिनला हार्दिकच्या २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-पाकिस्तान लढतीत चीअर करताना पाहिलं गेलं होतं. इंस्टाग्रामवरही दोघे एकमेकांना फॉलो करत होते, पण नंतर अशा दोघांचा ब्रेकअप झाले, असे वृत्त समोर आले. दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले असून हे नाते एक वर्षही टिकले नसल्याची चर्चा सुरू झाली.
हेही वाचा:





