Pulkit Samrat : “माझं 2.5 किलो वजन आणि…”; ‘या’ आजाराने त्रस्त अभिनेत्याने शेअर केला धक्कादायक अनुभव
Pulkit Samrat : इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर त्याने आपल्याचा मलेरियाची लागण झाली असून यामुळे आपले २.५ किलो वजन घडल्याचे सांगितले आहे.

Pulkit Samrat : बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट सध्या एका कठीण काळातून जात आहे. तो आपल्या प्रभावी शरीरयष्टीसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. त्याच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
पुलकितला मलेरियाची लागण झाली असून, याची माहिती त्याने स्वतः सोशल मीडियावरुन दिली आहे. इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर त्याने आपल्याला मलेरियाची लागण झाली असून यामुळे आपले २.५ किलो वजन घडल्याचे सांगितले आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याने आजारातून बरे होत असतानाचा स्वतःचा एक फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना त्याच्या प्रकृतीबद्दल महत्वाची माहिती दिली. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पुलकीतने लिहिले की, “मलेरियाचा त्याच्या शरीरावर अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर परिणाम झाला आहे. या आजारामुळे त्याचे २.५ किलो वजन कमी झाले आहे आणि त्याची बरीच शक्तीही गेली आहे.”
नेमकं काय म्हणाला पुलकित सम्राट?
“मलेरियाचा माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त परिणाम झाला आहे. माझे २.५ किलो वजन आणि बरीच ताकद कमी झाली आहे. पण मला माझ्या शरीराची चांगली ओळख आहे. आपण हे शरीर यापूर्वीही घडवले आहे आणि पुन्हा घडवू.” असा आत्मविश्वास त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमधून व्यक्त केला आहे.
पुलकित सम्राटला मलेरियाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्याचे चाहते, मित्र आणि हितचिंतक भारावून गेले आहेत. चाहते सोशल मीडियावर कमेंट्स आणि मेसेजेस पाठवून तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
चाहत्यांमध्ये उत्सुकता
पुलकित सम्राट याने अनेक चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका कायम चर्चेचा विषय ठरल्या. ‘फुक्रे’ या चित्रपटाने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. तो आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतो. राहु-केतु या चित्रपटात पुलकित शेवटचा दिसला होता. आता आगामी काळात पुलिकत कोणत्या भूमिकेत दिसणार याविषयी चाहत्यांना उत्सुकता असून त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी अधिकृत माहिती सध्यातरी समोर आलेली नाही.
Eknath Shinde: ‘वंदे मातरम्’ ऐवजी लागलं बॉलीवूडमधील गाणं; एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात भलतीच चूक






