Pankaja Munde : “मला फॅशनची कोणतीही हौस नाही, पण…”; रॅम्प वॉकवरून टीका करणाऱ्यांना पंकजा मुंडेंचे सडेतोड उत्तर
Pankaja Munde : "मला पुन्हा रॅम्प वॉक करावा लागला, तर मी नक्की करेन"

Pankaja Munde : मंत्री पंकजा मुंडे यांचा अलीकडेच एका फॅशन शोमधील रॅम्प वॉकचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. मात्र एकीकडे राज्यावर दुष्काळाचं संकट असताना त्यांच्या या रॅम्प वॉकवरून पंकजा मुंडेंवर प्रचंड टीका करण्यात आली होती. या ट्रोलिंगवर आता पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबईत झालेल्या बॉम्बे टाइम्स फॅशन वीकवरील रॅम्प वॉकबद्दल बोलताना पंकजा मुंडे यांनी, “ग्रामीण महिलांना न्याय मिळावा आणि त्यांच्या कामाला ओळख मिळावी या उद्देशानेच आपण हा रॅम्प वॉक केला आणि मी अशा रॅम्प वॉकमध्ये पुन्हा सहभागी होईन”, असेही त्यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
“एका मोठ्या फॅशन शो कार्यक्रमात मला निमंत्रित करण्यात आले होते, ही कौतुकास्पद बाब आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील सीईओंनी सादरीकरण केले. आम्ही तिथे मॉडेल म्हणून गेलो नव्हतो. पर्यावरणमंत्री म्हणून मला तिथे आमंत्रित करण्यात आले होते, जेणेकरून कापड पर्यावरणपूरक कसे आहे, हे लोकांपर्यंत पोहोचावे.
जालना जिल्ह्यातील तुती उत्पादक शेतकरी व हातमाग कारागिरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा साड्यांचा स्टॉल लावण्यात आला होता. अनेकजण ते कपडे उत्सुकतेने पाहत व विकत घेत होते, याचा मला अभिमान वाटतो,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
“महिलांना रोजगार मिळावा आणि ‘सस्टेनेबल फॅशन’बद्दल जनजागृती व्हावी, यासाठीच आम्ही रॅम्प वॉक केला. या महिलांची साडी दिल्ली, मुंबई किंवा इतर कोणत्याही शहरात विकली जाणार असेल, तर मी तिथेही रॅम्प वॉक करायला तयार आहे,” असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
‘फॅशनची कोणतीही हौस नाही’
“मी २२ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे आणि ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करते. एका मोठ्या कार्यक्रमात जालन्यातील महिलांचा स्टॉल लागणे ही खूप मोठी गोष्ट आहे. अनेक सेलिब्रिटी तिथे येऊन जालन्यातील साडी विकत घेत होते.
मला फॅशनची कोणतीही हौस नाही. पण या महिलांच्या भल्यासाठी मला पुन्हा रॅम्प वॉक करावा लागला. कारण माझ्या जालन्यातील महिलांची साडी मुंबईतील महिलांनी खरेदी केली, तर तो पैसा थेट जालन्यातील महिलांच्या खिशात जाईल,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
हेही वाचा:
Satara : लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या नातवाची जिल्हा बँकेत एन्ट्री; ४२ वर्षांचा वनवास संपला!





