“मी अवतारात आलेयं”; प्राजक्ता माळीच्या ‘नो मेकअप लूक’ला चाहत्यांची पसंती

Prajakta Mali | मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. नुकतेच तिने एका चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी प्राजक्ता साधं शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली होती. मात्र तिच्या या साधेपणाचे देखील चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.
‘बाप तुझ्यापायी’ या वेब सीरिजचा प्रीमियर सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. पण, नेहमी पारंपरिक साडीमध्ये किंवा खास डिझायनर ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर येणाऱ्या प्राजक्ताचा यावेळी वेगळा लुक पाहायला मिळाला. Prajakta Mali |
View this post on Instagram
प्राजक्ता यावेळी नो मेकअप लूक आणि एका पांढऱ्या रंगाच्या साध्या शर्ट, जीन्समध्ये रेड कार्पेटवर फोटोसाठी उभी राहिली होती. तेव्हा फोटोसाठी पोझ देताना प्राजक्ता माळी हसत फोटोग्राफर्सला म्हणाली, “मी आज अवतारात आले आहे.” मात्र तिच्या या उत्तराला उपस्थित मीडियानेही पसंती दर्शवली. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. Prajakta Mali |
प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील मेघना या पात्राने तिला घराघरात ओळख मिळाली. याशिवाय हंपी, लकडाऊन, तीन अडकून सीताराम या सिनेमांमध्ये प्राजक्ताने काम केलं आहे. ती शेवटची ‘फुलवंती’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने निर्मितीची जबाबदारीही यशस्वीरित्या पार पाडली होती. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
हेही वाचा:
सिकंदर शेखच्या अटकेबाबत शंका? सुप्रिया सुळेंचा थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन; दिले ‘हे’ आश्वासन





