Abdul Sattar met Manoj Jarange : ‘मित्र म्हणून आलोय’; अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, ‘या’ मुद्यावर झाली चर्चा
Abdul Sattar met Manoj Jarange : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

Abdul Sattar met Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी दिली आहे. त्यांनी सरकारला २८ अॅागस्ट या दिवशीचा अल्टिमेटम दिला असून जर मागण्या मान्य झाल्या नाही तर २९ अॅागस्टपासून पुन्हा आंदोलनाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा लोकप्रतिनीधींच्या जात प्रमाणपत्र रद्द केल्याच्या मुद्यावरुन मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या कामाकाजावर ताशेरे ओढले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
तसेच मंत्री संजय शिरसाट यांच्यावर मनोज जरांगे यांनी गंभीर आरोप केले होते. यानंतर एक महत्वाची घडामोड घडली आहे. शिवसेना पक्षाचे नेते माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली.
या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याची समजते. आगामी आंदोलनाची धग कमी करण्यासाठी आणि सरकारच्या वतीने मध्यस्थी करण्यासाठी सत्तार यांनी जरांगे यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीदरम्यान मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सत्तारांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मिळत आहे.
नेमकी काय चर्चा झाली?
जरांगे यांनी “चूक होत असते, ती दुरुस्त करा,” असा रोकठोक सल्ला सत्तारांना दिला. यावेळी अब्दुल सत्तार यांनी “मी येथे एक मित्र म्हणून आलो आहे, सरकार नक्कीच काहीतरी मार्ग काढेल,” अशा शब्दांत आश्वस्त केले. आपल्याला माझी हात जोडून विनंती आहे,” असे देखील अब्दुल सत्तार मनोज जरांगेंना म्हणाले.
…तर मुंबईत जाणार
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे येत्या २९ ऑगस्टपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आहेत. प्रश्न असा आहे की जरांगे अंतरवाली सराटी येथे आंदोलन करणार की मुबंईत याबद्दल स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेतला जणार असे सांगण्यात आले आहे. मात्र, जरांगे यांच्याकडून आंदोलन अंतरवाली सराटी येथेच सुरू करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे आंदोलन निर्णायक असून जर प्रश्न निकाली काढला नाही तर मुबंईत जाणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Telangana fire : तेलंगणात औषध कंपनीच्या भीषण स्फोटात २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू ; १० जण गंभीर जखमी





