‘मला शाळेत जाणारी मुलगी आहे, तिने हे वाचलं तर…’ मृत्यूच्या खोट्या पोस्टवरून श्रेयसने केला संताप व्यक्त

Shreyas Talpade । सोशल मीडियावर अभिनेता श्रेयस तळपदे याच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली जात आहे. या खोट्या पोस्टवर आता श्रेयसने संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर त्याने,’मी जिवंत आहे…’ असं म्हणत स्वत:च पुढे येऊन याबाबत खुलासा केला आहे
View this post on Instagram
गेल्या काही दिवसांपासून सोशलवर श्रेयसच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली जात आहे. यावर त्याने पोस्ट केली आहे की,’ ‘विनोदबुद्धी चांगली असते, पण त्याचा गैरवापर काहींना इजा करणारा असतो. एक थट्टा म्हणून ही बातमी पसरली असावी पण आता माझ्या कुटुंबासाठी हे काळजीचं आणि तणावाचं ठरत आहे.’ त्याने पुढे लिहिले की,’मला व्हायरल पोस्ट कळाली, कोणतरी ही थट्टा केली होती. पण ज्यांना माझी काळजी आहे त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. खासकरून माझ्या कुटुंबासाठी हे त्रासदायक ठरत आहे. मला शाळेत जाणारी मुलगी आहे. खोट्या बातमीचा तिच्यावर परिणाम होत आहे. तिला तिचे मित्र आणि शिक्षक प्रश्न विचारत आहेत.’ असं म्हणत त्याने पोस्टमधून संताप व्यक्त केला आहे.
त्याने आपल्या कुटूंबा बाबत काळजी व्यक्त करत पुढे लिहले,’माझी मुलगी लहान आहे. ती अद्याप अनेक गोष्टी समजू शकत नाही. मी यासंदर्भातील पोस्ट दुपारी पाहिली होती. पण, मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण, त्यानंतर मला अनेकांचे फोन आले. माझी काळजी करणाऱ्या लोकांनी विचारपूस केली. त्यामुळे मला हे लोकांसमोर सांगण्याची वेळ आली आहे. आता हे थांबवा मी जिवंत आहे आणि ठीक आहे.’
त्याने बिग बॉस या शोचे नाव घेत लिहिले,’खोटी बातमी देणाऱ्या व्यक्तीची पोस्ट इथे मी नमूद केली असती पण त्याला आणखी प्रसिद्धी मिळाली असती आणि तो नंतर बिग बॉसमध्ये दिसला असता. आणि मला ते करायचं नाही’ असं म्हणत त्याने खोट्या बातम्या आणि फेक पोस्टवरून श्रेयसने चांगलेच सुनावले.





