Pawan Singh : मराठी येत नाही, मराठी बोलणार नाही, मला मारलं तरी चालेल : पवन सिंग

Pawan Singh : राज्यात सध्या मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरू असून, राजकारणातही याचे पडसाद पाहायला मिळत आहे. राजकारण्यांपासून कलाविश्वातील सेलिब्रिटीही आपलं मत मांडताना पाहायला मिळत आहे. आता भोजपूरी अभिनेता आणि गायक पवन सिंग याने याविषयी आपलं मत व्यक्त केले आहे. मराठी येत नाही आणि मराठी बोलणार नाही, असे स्पष्टपणे त्याने सांगितले आहे. त्याच्या या विधानाला भजन सम्राट यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
माझा जन्म बंगालमध्ये झाला, पण मला बंगाली येत नाही. मला असंही वाटत नाही की मी बंगाली शिकू शकेन. म्हणून मी बोलत नाही. मला मराठीही येत नाही. मला हिंदी बोलणयाचा अधिकार असल्याचे पवन म्हणाला आहे. त्याच्या या विधानावर वाद होण्याची शक्यता आहे. मी महाराष्ट्रात राहतो म्हणून मला मराठी बोलायलाच हवी, हे काय आहे? ही तर उद्दामपणाची गोष्ट आहे. त्याच्या या विधानाने त्याने वादाला आमंत्रण दिले आहे.
मी कामासाठी मुंबईला जाईन. जास्तीत जास्त लोक काय करतील, मला मारतील? मरणाची भीती मला वाटत नाही. मराठी येत नाही. मराठी बोलणार नाही, मला मारलं तरी चालेल, असे थेट आव्हानच पवनसिंग याने बोलताना दिले आहे. तर त्याने केलेल्या या विधानाच्या समर्थनार्थ भजन सम्राट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना मराठी खूप आवडते. ते मराठीत गाणीही गातात. पण हिंदी ही देशाची मातृभाषा आहे. म्हणून सर्वत्र हिंदी बोलली पाहिजे, असे अजब विधान त्यांनी केले आहे.
कोण आहे पवन सिंग?
पवन सिंग याने केलेल्या विधानावरून त्याच्यावर टीकेचा भडिमार होण्याची शक्यता आहे. तसेच त्याच्या विधानावरून वादही होऊ शकतो. पवन सिंग भोजपूरी इंडस्ट्रीतील आघाडीचा गायक आणि अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने बॅालीवूडच्या स्त्री २ या चित्रपटातील एक गाणं गायलं आहे.
हेही वाचा : अभिजीत केळकर भातलावणीसाठी पोहोचला कोकणात; म्हणाला, ‘अन्नाचा प्रत्येक कण पिकवण्यासाठी…’





