“…तर मी जगू शकणार नाही,” केंद्रीय मंत्र्याने ‘या’ कारणामुळे पदावरून हटवण्याची पुन्हा केली मागणी

Suresh Gopi | केंद्रीय मंत्री आणि अभिनेते सुरेश गोपी यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदातून मुक्त करून चित्रपटांमध्ये काम करण्याची मागणी केली आहे. केरळमधून भाजपाचे एकमेव खासदार निवडून गेलेले सुरेश गोपी यांना मोदींच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र मी अभिनयाशिवाय जगू शकणार नाही, असं मंत्री सुरेश गोपी यांनी म्हटलं आहे. यापूर्वी देखील मंत्रीपदाची पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी मंत्रिपदावरून दूर करावं अशी इच्छा व्यक्त केली होती.
एका फिल्म सोहळ्यादरम्यान सुरेश गोपी म्हणाले की, “अभिनय हा माझा छंद आहे. सिनेमाशिवाय मी राहू शकत नाही. जर मला मंत्रिपदावरून हटवले तर मी खूप खुश होईन. मंत्री बनण्यापूर्वी मी आमच्या नेत्यांना हेच सांगितले होते. मी अमित शाहांना भेटलो, त्यांनी मला तुमच्याकडे किती सिनेमे आहेत असं विचारले. त्यावर माझ्याकडे जवळपास २२ सिनेमा असल्याचे सांगितले होते. तसेच मला अभिनय पुन्हा सुरु करण्याची परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे.”
“तरीही मी सर्वांना सांगू इच्छितो, मी ६ सप्टेंबरला ओट्टाकोम्बन या सिनेमातून अभिनयात पुन्हा पर्दापण करत आहे. एक मंत्री म्हणून जबाबदारीसोबत त्रिशूरमध्ये माझ्या मतदारांना वेळ देता येत नाही. जर मला मंत्रिपदावरून हटवले तर मी अभिनयही करू शकतो आणि माझ्या मतदारसंघातील मतदारांसोबतही संपर्कात राहू शकतो, “असं केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी सांगितले.
“मला कधीही मंत्री व्हायचे नव्हते. मला मंत्रिपद माझ्यासाठी नव्हे तर त्रिशूरच्या जनतेसाठी देण्यात आले. मी आजही माझ्या नेत्यांचे ऐकतो परंतु अभिनयाशिवाय मी जगू शकत नाही. त्यामुळे लवकरच मला चित्रपटांमध्ये काम करण्याची परवानगी मिळेल, अशी आशा आहे, असं सुरेश गोपी यांनी सांगितले दरम्यान, सुरेश गोपी यांनी २५० हून अधिक सिनेमे केले आहेत.
हेही वाचा:
मोठी बातमी: पुण्यातील आंदोलनाला मोठं यश; अखेर MPSCची परीक्षा पुढे ढकलली





