“मी ट्रेनमध्ये चढली त्यानंतर….”; प्रसिद्ध अभिनेत्रीने धावत्या लोकलमधून मारली उडी, कारण काय? कोण आहे करिश्मा शर्मा?

Karishma Sharma : हिंदी सिनेमाविश्वातील एका अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. तिचा अपघात झाल्याचं तिने पोस्टमधून सांगितलं असून, तिला गंभीर दुखापत झाली आहे. अभिनेत्रीने पोस्टमधून फोटोही शेअर केले आहेत. यामुळे तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे.
अभिनेत्री करिश्मा शर्मा हिने धावत्या ट्रेनमधून उडी मारली असून, यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आहे. तिला तातडीने रुग्णालायत दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिने सोशल मीडियावरून रुग्णालयातील फोटो शेअर करत अपघाताची माहिती दिली आहे.
मुंबई लोकमधून करिश्मा प्रवास करत होती. मुंबई लोकलमधून प्रवास करताना ती ट्रेनमध्ये चढली. परंतु त्यानंतर तिच्या लक्षात आले की, आपल्यासोबतच असणारे मंडळी ट्रेनमध्ये चढलीच नाहीत. त्यानंतर तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. यामुळे ती खाली पडली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर मार लागला असल्याची माहिती तिने स्वतः पोस्टद्वारे दिली आहे.
नेमकं काय घडलं?
काल शूटिंगसाठी चर्चगेला ट्रेनने जायचे ठरवले. मी साडी नेसली होती. मी ट्रेनमध्ये चढली त्यानंतर ट्रेन सुरु झाली. माझ्या लक्षात आलं की, माझ्या मित्रांनी ट्रेन पकडलीच नाही. त्यामुळे मी उडी मारली आणि पाठीवर पडले. माझ्या डोक्यालादेखील मार लागला आहे. माझ्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. शरीरावर जखमा झाल्या आहेत. डॉक्टरांनी MRI करायला सांगितलं आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मला खूप वेदना होत आहेत, असं करिश्मा शर्माने पोस्टमध्ये म्हटलं आहे. मला लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करा, असं आवाहनही तिने चाहत्यांना केलं आहे.
कोण आहे करिश्मा शर्मा?
अभिनेत्री करिश्मा शर्मा ही रागिनी एमएमएस रिटर्न्स या सिनेमातून प्रसिद्धीच्या झोतात आली. तिचा जन्म २२ डिसेंबर १९९३ रोजी मुंबईत झाला. ती एक प्रसिद्ध अभिनेत्री मॅाडेल आहे. तिने करिअरची सुरूवात टेलिव्हिजनपासून केली. चित्रपट व वेब सीरिजच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली. तिने प्यार का पंचनामा २ या सिनेमात टीनाची भूमिका केली होती. तर ‘उजडा चमन’ या चित्रपटातही तिच्या अभिनयामुळे ती चर्चेत आली. ती कायमच तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे सतत चर्चेत असते.
हेही वाचा : “भारत आणि चीनवर 100% टॅरिफ लावा”; युरोपियन युनियननंतर आता G7 वर ट्रम्पचा दबाव





