“मी तिचा ना बाबा, नाही बॉयफ्रेंड”; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर आमिर स्पष्टच बोलला

Amir Khan | अभिनेता आमिर खानने ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाद्वारे दमदार कमबॅक केलं आहे. यानिमित्त त्याने दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री फातिमा सना शेखसोबतच्या नात्याबाबत भाष्य केले. आमिर खानने काही दिवसांपूर्वीच त्याची गर्ल फ्रेंड गौरी स्प्रॅटबरोबरच्या नात्याबद्दलची घोषणा केली होती. मात्र यापूर्वी तो अभिनेत्री फातिमा सना शेखला डेट करीत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
आमिर खानच्या ‘दंगल’ सिनेमात फातिमा सना शेखची मुख्य भूमिका होती. नंतर तिने त्याच्याच ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ सिनेमात काम केलं. तर दुसरीकडे आमिर २७ वर्ष लहान अभिनेत्री फातिमाला डेट करत असल्याची अफवा पसरली होती.
याबाबत एका मुलाखतीत आमिर म्हणाला, “ठग्स ऑफ हिंदुस्तानसाठी मी आधी आलिया भट, श्रद्धा कपूर, दीपिका यांना ऑफर दिली होती. मात्र त्यांनी नकार दिला होता. म्हणून फातिमाला कास्ट करावं लागलं. दिग्दर्शकाला फातिमाला कास्ट करायचं नव्हतं, कारण दंगलमध्ये तिने माझ्या मुलीची भूमिका साकारली होती. तर ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये मी तिचा बॉयफ्रेंड होतो. शेवटी दिग्दर्शकाने स्क्रीप्टमधून आमचे रोमँटिक सीन्सच हटवण्याचा निर्णय घेतला. नाही मी तिचा बाबा आहे. नाही मी तिचा बॉयफ्रेंड आहे. आम्ही फक्त चित्रपटासाठी काम करतो.” Amir Khan |
पुढे आमिर अमिताभ बच्चन यांच्याबद्दल म्हणाला, “अमिताभ बच्चन आणि वहिदा रेहमान यांनीसुद्धा प्रियकर, प्रेयसीच्या भूमिका साकारून सुद्धा आई आणि मुलाची भूमिका साकारली आहे. प्रेक्षक मूर्ख नाहीत. त्यांना माहीत आहे की, चित्रपटातील कलाकारांचं नातं हे फक्त चित्रपटापुरतंच मर्यादित असतं. ते खऱ्या आयुष्यात एकमेकांचे आई किंवा वडील नसतात. आपण कसं सांगतो यावर सगळं अवलंबून असतं. आपण जर असा विचार करत असू तर आपण प्रेक्षकांना कमी लेखत आहोत.” Amir Khan |
दरम्यान, आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०२२ साली आलेल्या ‘लाल सिंह चड्डा’च्या अपयशानंतर आमिर खान निराश झाला होता. मात्र आता त्याने दमदार कमबॅक केलं आहे. या सिनेमात आमिरने दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल कोचची भूमिका साकारली आहे. Amir Khan |
हेही वाचा:
शिरूरचे डॉ. राजेंद्र दुगड यांचा अहमदाबाद येथील ज्योतिष महाकुंभ संमेलनात पुरस्काराने गौरव




