घायल हूँ इसलिए घातक हूँ! ‘धुरंधर’चा धमाकेदार टीझर रिलीज; रणवीरच्या हटक्या लुकने वेधले लक्ष

Dhurandhar movie teaser : अभिनेता रणवीर सिंह याचा बहुचर्चित धुरंधर चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘धुरंधर’ची बरीच चर्चा केली जात होती. रणवीर सिंह आणि संजय दत्त यांचे काही सेटवरचे फोटो व्हायरल झाले होते. अखेर धुरंधरचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे.
खरंतर इतर चित्रपटांपेक्षा वेगळ्या पद्धतीचा हा टीझर आहे. टीझरमध्ये केवळ पात्रांना फोकस करण्यात आले आहे. टीझरवरून चित्रपटाचा कथेचा अंदाज लावले कठीण असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर धरंधरच्या टीझरला घेऊन अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. नेटकऱ्यांकडून धुरंधर चित्रपटाचे टीझरचे कौतुक केले जात आहे.
या टीझरमध्ये सर्व कलाकारांची स्वतःची एक वेगळी शैली दाखविण्यात आली आहे. ‘धुरंधर’चा टीझर पाहिल्यानंतर, नेटकऱ्यांनी यूट्यूबवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले ‘चित्रपटाचा टीझर त्याच्या क्लायमॅक्ससारखा वाटत आहे. चित्रपट किती चांगला असेल याची मी कल्पना करू शकत नाही.’ दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘ही एक उत्तम कास्टिंग आहे.’ संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर माधवन, रणवीर सिंग.’
Your hardwork, grit, talent, patience & journey is nothing short of a film in itself !This echoes your love for cinema & audience❤️@AdityaDharFilms ! Congratulations Lokesh, Shiv, Ojas & team! Ranveer, Sanju sir, Akshaye sir, Maddy Sir, Arjun have outdone themselves🤙🏻#DHURANDHAR pic.twitter.com/srvT4T3Cxb
— Yami Gautam Dhar (@yamigautam) July 6, 2025
अभिनेता रणवीर सिंहचा आज ४० वा वाढदिवस असून त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने धुरंधर चित्रपटाचा टीझर रिलीज करून चाहत्यांना सरप्राईज भेट दिली आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले आहे.
हेही वाचा : 26/11 मधील कमांडोचा राज ठाकरेंना सवाल; “मी युपीचा, महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा…”





