26/11 मधील कमांडोचा राज ठाकरेंना सवाल; “मी युपीचा, महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा…”

Pravin Kumar Teotia | राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. मनसेने मराठीवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच आता 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील नायक एक्स मार्कोस (मरीन कमांडो फोर्स) प्रवीण कुमार तेवतिया यांनी भाष्य केले आहे. प्रविण तेवतिया यांनी ट्वीट करत राज ठाकरेंना थेट सवाल केला आहे.
काय म्हणाले तेवतिया?
“मी 26/11 च्या हल्ल्यात मुंबई वाचवली. मी उत्तर प्रदेशचा आहे आणि मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले आहे. मी ताज हॉटेल वाचवले. त्यावेळी राज ठाकरेंचे हे तथाकथित योद्धे कुठे होते? देशाचे विभाजन करू नका. हास्याला भाषा नसते,” असे एक्स मरीन कमांडो प्रवीण कुमार तेवतिया यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या पोस्टसोबत त्यांनी वर्दीतील एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर UP असे लिहिलेले आहे आणि गळ्यात बंदूक दिसत आहे. तसेच तेवतिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषा वादासंदर्भातील एका व्हिडिओवर प्रतिक्रिया देते असल्याची पोस्टही केली आहे.
I saved Mumbai on 26/11.
I bleed for Maharashtra.
I’m from UP.
I saved the Taj Hotel.
Where were Raj Thakre’s so Called Warriors?
Don’t divide the Nation.
Smiles don’t require any Language. https://t.co/z8MBcdcTAW pic.twitter.com/uZAhM4e6Zq— Adv Praveen Kumar Teotia (@MarcosPraveen) July 5, 2025
;
प्रवीण कुमार तेवतिया हे माजी कमांडो (MARCOS) आहेत. त्यांनी मुंबईतील ताज हॉटेलवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान, दहशतवादविरोधी कारवाईत आपल्या पथकाचे नेतृत्व केले होते. या कारवाईदरम्यान त्यांना अनेक जखमा झाल्या होत्या. त्यांना चार गोळ्याही लागल्या होत्या. त्यांच्या जलद कारवाईने१५० हून अधिक लोकांचा जीव वाचला.
हेही वाचा :





