कला-दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आहे निर्मिती
पुणे – हुतात्मा बाबू गेनू मंडळ यंदा पेशवाईची साक्ष देणारा “शनिवारवाड्या’ची प्रतिकृती साकारणार आहे. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी याविषयी माहिती दिली.
अस्तित्त्वात असलेल्या शनिवारवाड्याचा दरवाजा ही फक्त वाड्याची तटबंदी आहे. तेथून दोनशे फुटांवर असलेला लाकडी शनिवारवाडा हे पेशव्यांचे निवासस्थान होते. इतिहासकालीन काळाच्या ओघात “शनिवारवाडा’ आगीत नष्ट झाला. त्याच शैलीत कला-दिग्दर्शक नितीन देसाई हे वाड्याची निर्मिती केली आहे. हा देखावा “पानीपत’ या चित्रपटात सादर केला आहे. 111 फूट उंच 200 फूट लांब आणि 40 फूट रुंद देखावा बनवण्यात येणार आहे.
मुख्य दरवाजा, तटबंदी बुरुज त्यानंतर पाण्याचे हौद असून, त्यात रंगीबेरंगी कारंजी बनवण्यात आले आहेत. मुख्य दरवाजाजवळ दोन सालंकृत गजराज आहेत. भरजरी रत्नजडीत पडदे, घंटा, आरसे, झुंबर, शाही पद्धतीने सजवलेले “गणेश महाल’ आणि त्यामध्ये श्रींची मूर्ती विराजमान होणार आहे.