अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना मोठा धक्का ; मुलगा हंटर बायडन यांना 25 वर्षांची शिक्षा ?

Huntre Biden। अमेरिकेतील आगामी अध्यक्ष पदाच्या डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडन यांच्या नावाची चर्चा जातात सुरु आहे. मात्र असे असताना जो बायडन यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन यांना दोषी ठरवलं आहे. अवैधपणे शस्त्र खरेदी करणे आणि अंमली औषधांचा वापर करण्यासंदर्भात खोटं बोलल्या प्रकरणी हंटर बायडन दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात हंटर बायडन यांना 25 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे,
अमेरिकेच्या इतिहासातील पहिली वेळ Huntre Biden।
दरम्यान, जो बायडन अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याही अध्यक्षाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची पहिली वेळ आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात न्यायालयाने निर्णय जाहीर केलाय. 54 वर्षांच्या हंटर बायडननं 2018 मध्ये 38-कॅलिबर कोल्ट कोबरा रिवॉल्वर खरेदी केली होती. ही रिवॉल्वर खरेदी करताना त्यांनी अंमली पदार्थांच्या उपयोगाबाबत खोटी माहिती दिली होती. त्यामध्ये ते दोषी आढळले आहेत. हंटर बायडन यांनी त्यावेळी आरोप फेटाळून लाल होते.
हंटर बायडन यांना दारु आणि क्रॅक कोकेनचे व्यसन होते. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाकडून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा इच्छुक आहेत. अध्यक्ष पदाची निवडणूक चार महिन्यांवर आलेली असताना आता हंटर बायडन यांना दोषी ठरवल्याने जो बायडन यांच्या निवडणूक मोहिमेवर परिणाम होणार का हे पाहावं लागेल.
न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान करतो Huntre Biden।
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर हंटर बायडन भावूक झाले होते. हंटर बायडन त्यांच्या वकिलांची गळाभेट करताना दिसून आले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी या प्रकरणाविषयी बोलताना म्हटलं की ते न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान करू, लवकरच वरच्या कोर्टात अपील करणार असे जो बायडन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जो बायडन सध्या अमेरिकेचे अध्यक्ष आहेत.त्यामुळं बायडन त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करुन मुलगा हंटर बायडन माफ करु शकतात. त्यांच्याकडे दोषींना माफ करण्याचा अधिकार आहे. मात्र, जो बायडन यांनी मुलाला माफ करणार नसल्याचं म्हटलं होतं.





