Sanjay Gaikwad । ‘वाघाची शिकार केली, दात गळ्यात घातला’ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड अडचणीत वाढ

Sanjay Gaikwad । शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड हे मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. ते नेहमीच विरोधकांवर टीका करत असतात. टीका करतांना अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत असतात. अशात संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमुळे संजय गायकवाड अडचणीत आले आहे. शिवजंयतीच्या दिवशी संजय गायकवाड यांनी स्थानिक वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखातीत आपण १९९७ मध्ये वाघाची शिकार केली होती. त्याच्या दात गळ्यात बांधला आहे. बिबट्या वगैरे तर आपण असेच पळवतो, असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. संजय गायकवाड यांची ही मुलाखत व्हायरल झाली. मग वनविभागाला जाग आली. त्यांनी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आमदार गायकवाड यांनी बुलढाणा शहरात शिवजयंती कार्यक्रमला उपस्थिती लावली. त्या मुलाखतीत त्यांना गळ्यात असणाऱ्या वाघाच्या दातासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. आमदार संजय गायकवाड यांनी राजेशाही थाटात कौतुकाने उत्तर दिले. ते म्हणाले, माझ्या गळ्यातील लॉकेटमध्ये वाघाचा दात आहे. त्या वाघाची १९८७ मध्ये मी शिकार केली होती. मुलाखत घेणाऱ्या पुन्हा विचारले वाघ होता की बिबट्या मग पुन्हा गायकवाड म्हणाले, वाघच…बिबट्या वगैरे तर मी असेच पळवतो.’ त्यांच्या या वक्तवयामुळे त्यांच्यावर आता टीकाही होत आहे.
पहा व्हिडिओ
होय मी वाघाची शिकार केली, आमदार संजय गायवाड यांनी कबुली दिली अन् झाली अडचण#Shivsena #Tigers pic.twitter.com/yK1ynWVi0F
— jitendra (@jitendrazavar) February 25, 2024





